पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी – डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्त्यांनी युती होवो अथवा न होवो स्वबळावर लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आज काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकी प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिल्हा प्रवक्ते श्री.सातलिंग शटगार यांनी केले.यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री, वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक बलोरगी, भीमाशंकर जमादार, जुगल किशोर तिवाडी,शिस्तपालन कमिटीचे सचिव तथा जिल्हा उपाध्यक्ष मल्लेशी बिडवे ,ओ.बी.सी. राज्य उपाध्यक्ष सुधीर लांडे ,जिल्हा संघटक रमेश हसापुरे, शालिवाहन माने देशमुख अरुण जाधव ,हरीश पाटील, सौदागर जाधव, सिद्राम सलवदे, सुलेमान तांबोळी, विजयकुमार हत्तुरे ,राजेश पवार संदीप भंडारी,सुलेमान तांबोळी, विजयकुमार हत्तुरे, राजेश पवार ,संदीप भंडारे, राधाकृष्ण पाटील ,मीनल ताई साठे, गजेंद्र खरात ,अमरजित पाटील ,श्रीशैल नरोडे , अरुणा बेंजरेप , अण्णासाहेब इनामदार,सुधीर रास्ते ,मयूर माने ,अभिराज शिंदे,जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे वसीम पठाण आदी उपस्थित होते.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा घेण्यासंबंधी कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले . स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान होणारे आजादी गौरव पदयात्रेचे (75 Km) नियोजन करण्यात आले.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंबंधी आढावा घेण्यात आला.सर्व सेलच्या पदाधिकारी यांच्याकडून सेलच्या कार्यकारिणीची माहिती घेण्यात आली.
नवीन सभासद नोंदणी संघटना मागणी व 25 जूनला होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याविषयी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना धवल दादा म्हणाले की,” कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी.आघाडी होवो अथवा न होवो स्वबळाने लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रशांत काळे (पंढरपूर),सिद्राम सलवदे (उत्तर सोलापूर), राजेश पवार (मोहोळ), अमरजीत पाटील (पंढरपूर), सुरेश हावले (मोहोळ), अकबर शेख (दक्षिण सोलापूर), विजय साळुंखे (बार्शी), सौदागर जाधव (माढा), पांडुरंग जावळे (माढा), महादेव जाधव (मंगळवेढा), अशोक पाटोळे (पंढरपूर), हरीश पाटील( दक्षिण सोलापूर), नितीन चोपडे (करमाळा ),अरुण जाधव (अक्कलकोट),सिद्राम वाघमोडे( मोहोळ), आप्पा शिवपुजे( मोहोळ ),शालिवाहन मानेदेशमुख (उत्तर सोलापूर) आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना निर्मलाताई ठोकळ म्हणाल्या की,” जिल्ह्यात काँग्रेस कडे तरुण कार्यकर्ते वळत असून धवलसिंह यांच्या प्रयत्नाने जिल्हा काँग्रेस बळकट होत आहे.मोहिते पाटील घराणे एक काम हाती घेतले की ते तडीस नेतात.”त्यामुळे जिल्ह्यात आगामी निवडणुकीत नक्कीच बदल दिसेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मोतीराम चव्हाण, प्रतापराव जगताप ,सुलेमान तांबोळी ,किरण जाधव, धर्मराज पुजारी ,मुन्ना हरणमारे, महादेव जाधव, रशीद शेख, लक्ष्‍मण भोसले, विजय साळुंखे ,दत्ता गाढवे, सतीश पाटील ,सुरेश नवले, राजकुमार पवार ,अमर सूर्यवंशी ,अशोक कोनापुरे, गोविंदराव पंखे ,विलास गडसिंग ,यश गडसिंग, सिद्धेश्वर रुपनर ,सुदर्शन आवताडे ,आप्पू शेख, अकबर शेख ,जे. टी जाधव, अल्लाउद्दीन शेख, दिलीप जाधव, मोहम्मद शेख, मुन्ना कुडके ,अमोल म्हमाने, जाहीर मनेर ,मोतीराम सुतार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. सातलिंग शटगार यांनी केले तर आभार श्री. सुलेमान तांबोळी यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here