नेहरू युवा केंद्र तर्फे जलशक्ती व आजादी का अमृत महोस्तव पथनाट्याचे आयोजन  

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि.25:- भारत सरकार नेहरू युवा केंद्र, सोलापूर यांच्यावतीने जलशक्ती अभियान व आजादीचा अमृत महोत्सव अंतर्गत पथनाट्य कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के व जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र अजितकुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांनी आपल्या मनोगतामध्ये देशाचे स्वातंत्र्य, देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज यांचे महत्व सादरी करणातून प्रभावीपणे मांडावे अशा शुभेच्छा दिल्या.

जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार यावेळी सदर पथनाट्याची माहिती देताना म्हणाले की, सदरची रथयात्रा जिल्ह्यामध्ये 6 दिवस चालणार असून प्रतिदिन 4 वेगवेगळ्या गावांमध्ये एकूण 24 कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या पथनाट्यामध्ये पथनाट्यप्रमुख सौरभ वाघमारे, विशाल घंटे, अभिजित ताटे, सागर राठोड, शुभम जाधव, काजल चव्हाण, वैष्णवी सुतार, कोमल पंडीत, श्रेया पाटील, प्रणिता पाटील, साक्षी जांबळे यांचा समावेश आहे.या कार्यक्रमावेळी नेहरू युवा केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here