निष्क्रिय सत्ताधारी भाजप पदाधिकारीमुळे शहरात डेंग्यू पसरत असून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने फवारणी आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

निष्क्रिय सत्ताधारी भाजप पदाधिकारीमुळे शहरात डेंग्यू पसरत असून सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने फवारणी आंदोलन

डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करा – अंबादास बाबा करगुळे

 

सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळे सोलापूर शहरात डेंग्यूची साथ पसरत असून या निष्क्रिय भाजप पदाधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सोलापूर महापालिका गेट आणि आसपास डेंग्यू औषधाची फवारणी करून लवकरात लवकर डेंग्यूवर उपाययोजना करावी म्हणून आठवण करून देण्यात आली.

यावेळी बोलताना युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की, सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर शहरात डेंग्यूची साथ फैलावत असून अनेक ठिकाणी नागरिक डेंग्यूमुळे बाधित होत आहेत शहरातील रुग्णालयात सर्वत्र डेंग्यूचे पेशंट ऍडमिट आहेत. महापालिकेच्या वतीने कुठलेही उपाययोजना करताना दिसत नाही. डेंग्यूमुळे काही नागरिकांचा मृत्य ही झाला. यास सत्ताधारी भाजप पदाधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच डेंग्यू चा फैलाव रोखण्यासाठी ताबडतोब फवारणी व उपाययोजना करावी. स्वतंत्र विभाग सुरू करावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

तसेच यावेळी बोलताना प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की सध्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होत असून डेंग्यू रोखण्यासाठी महापालिकेने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी केली आहे.

या फवारणी आंदोलनात शहर मध्य विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष विवेक कन्ना, कार्याध्यक्ष युवराज जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, यल्लप्पा तूपदोळकर, सागर शहा, दीनानाथ शेळके, मल्लिनाथ सोलापुरे, प्रभाकर सादुल, शरद गुमटे, सुभाष वाघमारे, निलेश व्हटकर, नूर अहमद नालवार, रवींद्र शिंदे, विकास कांबळे, गणेश इंगळे, प्रमोद कलशेट्टी, रोहित भोसले, योगेश सोलापुरे, नागेश शहापुरे, लखन सुरवसे, केतन जव्हेरी, अनवर शेख, श्रीकांत दासरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here