नामदेव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्द्यांचा सन्मान !

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

अहमदनगर:- कोरोना काळात जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. या ऋणातून उतराई होण्यासाठी कोरोना योध्द्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. अहमदनगर नामदेव प्रतिष्ठान या संस्थेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक उपक्रम राबविल्याने कोरोना योध्द्यांना शाबासकीची थाप मिळाली असल्याचे प्रतिपादन आ.लहू कानडे यांनी करोना योध्द्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी केले. प्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी आ.लहू कानडे पुढे म्हणाले की, संत नामदेवांनी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. सर्व संतांना बरोबर घेऊन त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाचा धावा केला. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विषयी अनेक उत्तम प्रसंग सांगून त्यांची ख्याती श्रोत्यांपुढे मांडली. तसेच संत शिरोमणी श्री नामदेवां विषयी समाजाला अतिशय सविस्तर माहिती देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अमदनगर नामदेव प्रतिष्ठानला आमदार निधीतून सभामंडपसाठी निधी उपलब्ध करून देण्याचेही यावेळी आ.लहू कानडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. लहू कानडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सचिन गुजर, भाजपच्या कर्जत महिला अध्यक्षा मनिषा वडे, तसेच आरोग्याधिकारी मोहन शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापुसाहेब वैद्य, नाशिक प्रांतिकचे माजी अध्यक्ष नामदेवराव भुसे,दै. जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज आगे, पत्रकार मिलींद साळवे, मेजर सरदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोना महामारीत जिवांची पर्वा न करता रुग्णसेवा केली, आशा कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या की, अहमदनगर जिल्हा नामदेव प्रतिष्ठानने हा स्तुत्य उपक्रम घेऊन कोरोना काळात ज्यांनी योगदान दिले त्यांचा सन्मान करून समाजात एक आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अहमदनगर जिल्हा नामदेव प्रतिष्ठान या संस्थेला एक मोकळा प्लॉट उपलब्ध झाल्यास त्यांना आवर्जुन देण्यात येऊन त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मदत होईल.तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्कारार्थी श्री.अरविंद्र गुजर (संगमनेर), डॉ. उरणकर (पाथर्डी),सौ.मनिषा वडे (कर्जत), कु.साक्षी राजेंद्र वडे (कर्जत), श्री.शैलेश धोकटे (भिंगार, नगर),श्री. प्रसन्न घुमाळ (श्रीरामपूर) आशा पगारे (श्रीरामपूर), सुनिता कारंजकर (चंदनापूरी, संगमनेर), आरती चांडोले (लोहारे कसारे, संगमनेर), श्री. जितेंद्र डिंगोरे (चंदनापूरी, संगमनेर),श्री.मिलींद कुमार साळवे(श्रीरामपूर), मेजर सरदार (श्रीरामपूर) श्री.नितीन द्वारकादास नेवासकर (संगमनेर) या कोरोना यौद्ध्यांचा सन्मान पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्व समाज बांधवांनी समाजातील वाद मिटवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्र यावे,असे आवाहन यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापु वैद्य यांनी केले. यावेळी मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) लचके, सचिव अशोक दिवे, खजिनदार पत्रकार नरेंद्र लचके, राजेंद्र काकडे, संजय माळवदे, राजेंद्र भगतसर, विश्वस्त आबा उरणकर, कैलास खंदारे, संजय गुजर, राजा भाऊ चांडोले, दिपक चांडोले, मुकूंद देव्हारे, टापसे आदी बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले तर आभार प्रदर्शन दिवे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here