(विश्वराज (भैय्या) यांचा मोहोळच्या कुस्ती संयोजकांकडून यथोचित सन्मान)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ येथील नागनाथ केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांचे चिरंजीव भावी चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी कुस्तीचा फड गाजवत कुस्ती लावून एक प्रकारे मोहोळ तालुक्यात व शहरांमध्ये जोरदार प्रवेश केला असून यामध्ये भीमा परिवारातील सर्व नवतरुण युवक वर्गांमध्ये सद्यस्थितीला त्यांची क्रेझ दिसून येत आहे.
भीमा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक आजपर्यंत सामाजिक उपक्रम राबवले असून कारखान्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व घटकातील सर्व नवतरुणांना भीमा परिवार बरोबर संघटित करण्याचे मोठे कौशल्य त्यांच्याकडे आहे.
विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी या झालेल्या नागनाथ केसरी २०२१ कुस्ती स्पर्धेमध्ये, एकवीस हजार रुपये पारितोषिक जाहीर करून सर्व उपस्थित मान्यवरांकडून वाहवा मिळवली आहे. आगामी भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वराज (भैय्या) महाडिक यांनी संपूर्ण कार्यक्षेत्र पिंजून काढण्यास सुरुवात केली असून यामध्ये त्यांनी अनेक सामाजिक धार्मिक व लग्न समारंभामध्ये विशेष उपस्थिती लावली आहे.
यावेळी नागनाथ केसरी कुस्ती स्पर्धेचे निवेदन, धोत्रे सर, तांबोळे गावचे वस्ताद, संभाजी (नाना) कोकाटे, वस्ताद भिमराव मुळे,कुरूलचे वस्ताद रमेश जाधव, पुळुजचे वस्ताद शरीफ पैलवान शेख, पैलवान महादेव शेंडगे, विश्वास पांढरे, पंकज चव्हाण,अजित पाटील,राम चव्हाण,राजू पांढरे, दिनेश म्हमाणे, संतोष बचुटे,आदी मान्यवर व मोहोळ-पंढरपुर तालुक्याचे सर्व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.