नरोटेवाडी पाणी प्रश्नासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांनी दिल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचना! (अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नासाठी राजाभाऊ खरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केली पाहणी)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नरोटेवाडी पाणी प्रश्नासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांनी दिल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचना!

(अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नासाठी राजाभाऊ खरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केली पाहणी)

उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन मधून पाणी येण्यासाठी नान्नज ते नरोटेवाडी या दोन किमी अंतर खोडल्यास या भागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी उद्योजक राजू खरे यांच्याकडे याबाबत शेतकरी मेळाव्यात मागणी केली होती. यासाठी खरे यांनी तात्काळ याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. गुरुवारी सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत त्या भागाची पाहणी केली. यावेळी वरील मागणी अवघ्या काही दिवसातच पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले आहे. यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मिटविण्यात खरे यांच्या माध्यमातून यश मिळणार आहे.
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी वरील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी ही बाब शिवसेनेचे पक्ष प्रतोद आ. भरतशेठ गोगावले यांच्या कानावर घातली. यामधून शेतकऱ्याच्या या जिव्हाळ्याचा प्रश्न मिटावा यासाठी आ. गोगावले यांनी आपल्या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.यामुळे राजू खरे यांचे समवेत अधिकारी यांनी त्या भागाची पाहणी केली आहे.
याबाबत लवकरच अंदाजपत्रक सादर करून कामास मंजुरी मिळवून या कामास सुरुवात करण्यात येईल असेही उपस्थित अधिकारी यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिले आहे. यामुळे शेतकरी मेळाव्यात राजू खरे यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन सत्यात उतरणार आहे.

यावेळी इरिगेशन विभागाचे अधीक्षक अभियंता बागडे डी .ए,कार्यकारी अभियंता कोंडेकर डी जे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बजरंग देवकर, उत्तर सोलापूर शिवसेनेचे उप तालुका प्रमुख उमाकांत करंडे,उत्तर सोलापूर युवा सेनेचे तालुकाप्रमुख आकाश गजघाटे,सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्राम चाकोते, भीमाशंकर बिराजदार, विठ्ठल जाधव. रेवन उंबरे. उमाकांत करंड,. बजरंग देवकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजकुमार शिंदे, शशिकांत शिंदे, विजय साठे, अरुण सुरवसे., सुनील बनसोडे, दादासाहेब सुरवसे, विठ्ठल रुपनर. बजरंग देवकर, विजय साठे. विकास सावंत, अण्णा कोळेकर, गोपाळ गवळी, अजय रेवजे, विलास रेवजे, नंदकुमार गवळी,मल्लू रेवजे,बसवराज करपे, किरण चाकोते ,महादेव चाकुते, मेजर चोपडे, संजय पवार, शरद पवार,विजय गरड, समाधान बाबर, पांडुरंग परकाळे , जीवन देवकर, विशाल जाधव, , नंदकुमार गवळी, लक्ष्मण राठोड,अरुण जाधव, मनोरंजन जाधव, बाबासाहेब पवार, काशिनाथ भाकरे, रंगनाथ गुरव,प्रवीण काटे, आदींसह उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी , नरोटेवाडी व आणि नान्नज येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून तात्काळ सूचना

नारोटेवडीचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मिटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. याबाबत पाठबंधारे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर यांना लेखी आणि फोनद्वारे सूचना दिल्या आहेत.यानुसार पुणे येथील मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांचेकडे या कामी सर्व जबाबदारी सोपवली आहे. येत्या आठ या कामासाठी मंजुरी मिळावी याबाबतचे सर्व्हे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळेच सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी यांनी राजू खरे यांच्या समक्ष भागाची पाहणी केली आहे.त्यानुसार लवकरच अहवाल देऊन मंजुरी मिळेल आणि कामास सुरुवात होईल असेही सांगण्यात आले आहे. यामुळे या नरोटेवाडी भागातील शेतकऱ्यांचा राजू खरे यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here