धैर्यशील मोहिते-पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, ‘तुतारी’ घुमणार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

धैर्यशील मोहिते-पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, ‘तुतारी’ घुमणार

भाजपनं रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवार जाहीर केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उद्रेक झाला आहे. अकलुजच्या मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबानं रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोधात दर्शवला होता. पण, भाजपनं कोणताही निर्णय न घेतल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता धैर्यशील मोहिते-पाटील ‘तुतारी’ हाती घेणार असून महायुतीच्या अडचणीत वाढ होणार आहे

भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहित-पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला होता. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते-पाटील आणि रामराजे-नाईक निंबाळकर यांचे कुटुंबीय करत होते. पण, भाजपनं तशी पावले उचलली नसल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित मोहिते-पाटलांनी राजीनामा दिला आहे.

भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरयांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहित-पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला होता. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते-पाटील आणि रामराजे-नाईक निंबाळकर यांचे कुटुंबीय करत होते. पण, भाजपनं तशी पावले उचलली नसल्यानं अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित मोहिते-पाटलांनी राजीनामा दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here