धीरज साळे उजनी धरणाच्या पाण्याबाबत काय म्हणाले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

धीरज साळे उजनी धरणाच्या पाण्याबाबत काय म्हणाले

 

सोलापूर // प्रतिनिधी

उजनी धरण तीन दिवसांतच प्लसमध्ये आले आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा व नीरा खोऱ्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात येणारा विसर्ग वाढला आहे. धरणात शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 12.79 टक्के पाणी वाढले आहे. धरणात सध्या दौंड व बंडगार्डन येथून पाण्याचा मोठा विसर्ग येत आहे. दरम्यान, धरण 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत भरल्यानंतर वरून येणारा विसर्ग पाहून धरणाचे दरवाजे उघडले जातील. सध्या आम्ही सतर्कतेचा कोणताही इशारा दिला नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी उन्हाळ्यात मायनस 22 टक्‍क्‍यांपर्यंत गेली होती. पावसाने ओढ दिल्याने सोलापूर शहरासह शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु, मागील दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणात साधारणपणे 112 टीएमसी पाणी मावते. सद्य:स्थितीत धरणात 12.79 टक्‍क्‍यांपर्यंत पाणी आहे. धरणातील पाणीसाठा 50 अथवा 60 टक्‍क्‍यांवर आल्यानंतर दौंड, बंडगार्डनसह अन्य ठिकाणाहून धरणात येणारा विसर्ग पाहून दरवाजे उघडण्यासंदर्भात निर्णय घेतला जातो, असेही साळे यांनी या वेळी स्पष्ट केले. सध्यातरी धरणातील पाणीसाठा तेवढा नसल्याने सतर्कतेचा इशारा देण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाने त्या-त्या ठिकाणची परिस्थिती पाहून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असेल, असेही ते म्हणाले.

दौंड व बंडगार्डन येथून उजनी धरणात जवळपास 90 हजार क्‍युसेकचा विसर्ग येत आहे. शुक्रवारी मागील बारा तासात धरणात तीन टीएमसी पाणी आले आहे. आज शनिवारी सकाळी सहापर्यंत टक्केवारी 12.79 झाली आहे. धरणातील पाणीसाठा 60 टक्‍क्‍यांवर आल्यानंतर धरणात येणारा विसर्ग पाहून दरवाजे उघडण्याचा निर्णय होईल.

– धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, सोलापूर

धरणातील शनिवारची पाणीपातळी

पाणीपातळी : 491.970 मीटर

एकूण साठा : 1996.86 दलघमी

उपयुक्त साठा : 194.05 दलघमी

टक्केवारी : 12.79

दौंड विसर्ग : 52,754 क्‍युसेक

बंडगार्डन विसर्ग : 38,008 क्‍युसेक

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here