“धाडस” संघटनेचे शरद कोळी यांच्याकडून मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सन्मान
(ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर सही झाल्यामुळे केला जाहीर सत्कार)
सोलापूर // प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण कायद्या पास करून अध्यादेशावर राज्यपालांची सही करून घेतल्याबद्दल मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मुंबई मंत्रालय येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील ओबीसीचे नेते शरद कोळी, महाराष्ट्र समन्वयक हाशीब नदाफ, संदीप राठोड, सादिक कुरेशी, भारत जाधव, नलिनीताई चंद्रले, भोजराज पवार सर, संजय जोगी, पेटकर भोसले, दत्तात्रय छत्रे, आप्पा कोळी अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी राज्यातील ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी व राजकीय आरक्षण अस्तित्वात ठेवण्यासाठी जिवाच रान करू पण राजकीय आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे भूमिका स्पष्ट घेतली.
राज्यांमधल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावा गावा पर्यंत ओबीसीच्या अडीअडच जाणून घेऊन तात्काळ ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा असे सूचनाही त्या वेळेस देण्यात आल्या.