धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला!
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेस भवन मध्ये येऊन पदभार घेतला वाजत-गाजत पारंपारिक पद्धतीने त्यांचे काँग्रेस भवनात स्वागत करण्यात आले
यावेळी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील, मोतीराम चव्हाण, माजी आमदार रामहरी रुपनवर, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, बसवराज बगले,सोलापुर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस नागेशभाऊ गंगेकर व आदी पदाधिकारी उपस्थित होते.