दृष्टीमित्र साकीब गोरे यांच्या दृष्टी संवर्धंनाच्या कार्यावर आधारीत “ इन परसुईट ऑफ लाइट ” हया लघुपटाचा लोकार्पण सोहळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दृष्टीमित्र साकीब गोरे यांच्या दृष्टी संवर्धंनाच्या कार्यावर आधारीत “ इन परसुईट ऑफ लाइट ” हया लघुपटाचा लोकार्पण सोहळा संपन्न

मुंबई:- गेली तीन दशकं ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात नेत्रसेवेत जीवन वाहून घेतलेल्या दृष्टीमित्र साकीब गोरे यांच्या दृष्टी संवर्धंनाच्या कार्यावर आधारीत जनजागृती करणार्याे लघुपटाचा लोकार्पण सोहळा मा. देवेंद्रजी फडणवीस (विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र) यांच्या हस्ते नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. याप्रसंगी मा. किसन कथोरे (आमदार मुरबाड विधानसभा, भाजप जिल्हा अध्यक्ष, ठाणे ग्रामीण), ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर, आमदार कुमार ऐलानी, पदमश्री कल्पना सरोज, प्रा रवींद्र घोडविंदे, जाफर खातीब, मिलिंद धारवाडकर, निर्माते – दिग्दर्शक अमोल अरविंद भावे यांच्यासहित राजकीय, सामाजिक तसेच कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. हया लघुपटाची निर्मिती आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. कोविड नियमावलीचे पालन करून, मास्क व सामाजिक अंतर ठेवून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी दृष्टिमित्र साकीब गोरे यांच्याविषयी गौरवोदगार काढताना म्हणाले की, ‘एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक ध्येय ठरवितो, त्या ध्येयाकरिता वेडा होतो आणि आपलं सर्वस्व त्या ध्येयाच्या पाठीशी लावतो, त्यावेळी सामान्य माणूस म्हणून त्याचं कार्य सुरू होतं आणि बघता बघता आपल्या कर्तृत्वाने असामान्य बनतो. अशा प्रकारच्या असामान्य बनलेल्या साकीब गोरे यांचं अभिनंदन करण्याचं भाग्य मला मिळालं, त्यात मी स्वत:ला धन्य समजतो. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा हा लघुपट समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा ठरेल. मोतीबिंदू दृष्टि संवर्धनाचे त्यांचे हे अनमोल कार्य त्यांनी असंच चालू ठेवावं आणि त्यांचा सत्कार करायला पुन्हा मलाच बोलविण्यात यावं, अशी मी आशा बाळगतो’. आमदार किसान कथोरे म्हणाले की, ‘साकीब गोरे सारखी माणसं जेव्हा समाजकार्यात स्वत: ला झोकून देतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सलाम करावासा वाटतो. समाज जर घडवायचा असेल तर साकीब सारखी माणसं समाजकार्यात उतरली पाहिजेत’.

दृष्टिमित्र साकीब गोरे यांच्या ३० वर्षाच्या मोतीबिंदू दृष्टि संवर्धन सेवा पर्वावर आधारीत “In pursuit of life” हा लघुपट मा. आमदार किसन कथोरे यांनी निर्मित केला आहे. गेली तीस वर्ष साकीब गोरे यांना दृष्टी संवर्धंनाच्या कार्यावर आधारीत जनजागृती करताना आलेल्या असंख्य अडचणी, हृदयद्रावक अनुभव, घडामोडी आणि त्यावर मात करून प्रकाशमय जीवन देण्याचे केलेले सामाजिक कार्य हयाचा आढावा हया लघुपटात चित्रीत करण्यात आला आहे. जगभरातून हया लघुपटास भारत, अमेरिका, इंग्लंड, रशिया, तुर्की, इज्राईल, कुवैत, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रांस, मोनेको, इजिप्त, स्वित्झर्लंड व मेक्सीको हया देशातील नामांकित असे ५८ पुरस्कार मिळाले आहेत.

दृष्टीमित्र साकीब गोरे १९९२ पासून ३० वर्ष सातत्याने मोतीबिंदू दृष्टी संवर्धन हा सामाजिक उपक्रम राबवित असून ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील १२१७ गांव, पाडे, आदिवासी वाडी, कातकरी वाडी, दलित वस्ती व या शहरातील १३ लाख गरजू नागरिकांची नेत्र तपासणी केली आहे. दृष्टिदोष असलेल्या ९ लाख नागरिकांना मोफत उच्च प्रतीचे चश्मे वाटप केले असून ४८००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून स्वर्गीय दिनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदया संकल्पनेनुसार जनसेवा करण्याचे पवित्र काम केले आहे. त्यांच्या हया कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित असलेला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे. साकीब गोरे यांनी आपल्या कार्याची सुरुवात १९८७ ला कोहारी ट्रान्सपोर्टवर एक हमाल म्हणून केली आणि आज एक अन्संघ नायक म्हणून ओळखले जातात.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here