दूध संघाच्या खर्चात मी स्वतः बचत करणार- रणजित भैय्या शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(वार्षिक खर्च १०लाख रूपयांनी कमी होणार)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेऊन संघाला पूर्व वैभव मिळवून देण्यासाठी रणजित भैय्या शिंदे यांनी धाडसी पावले टाकायला सुरुवात केली आहे. अध्यक्षांसाठी असलेली संघाची गाडी त्यासाठी लागणारे डिझेल आणि भत्ता न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे वर्षाला अध्यक्षांच्या डामडौलावर खर्च होणारे साडेआठ ते नऊ लाख रुपयांची बचत होणार आहे. सोमवारी, सोलापुरातील दूध संघाच्या मुख्यालयात त्यांनी ही घोषणा केली. सद्यस्थितीत दूध संघाला अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे. अडचणींमुळे संघास समोरील कर्जाचा डोंगर देखील वाढत चालला आहे. दरमहा सुमारे 28 लाख रुपयांचे व्याज संघाला भरावे लागत आहे दैनंदिन दूध संकलनातही मोठी घट झाली आहे. सध्या स्थितीतीत केवळ 21 हजार 700 लिटर दुधाचे दैनंदिन संकलन होत आहे अशा स्थितीत संघाचा कारभार हाकणे जिकिरीचे ठरणार आहे.

अशा कठीण काळात संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रणजित शिंदे यांनी स्वीकारली आहे गाडी, डिझेल आणि भत्ता ना स्विकारण्याच्या निर्णयामुळे वर्षाला साधारणत: साडेआठ ते नऊ लाख रुपयांची बचत होणार आहे. तो बचत झालेला पैसा कर्मचाऱ्यांच्या पगारी साठी वापरण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here