दुधातील भेसळ रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना विधानभवनावर 26 जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार:- माऊली जवळेकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दुधातील भेसळ रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना विधानभवनावर 26 जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार:- माऊली जवळेकर

सोलापूर // प्रतिनिधी

दुधातील होत असलेली भेसळ पूर्णपणे थांबले पाहिजे अन्यथा…बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विधानभवनावर २६ जुलै २०२१ ला‌ मोर्चा काढण्यात येणार आहे….. सर्वसामान्य नागरिकांचे पूर्णान्न किंवा सकस आहार म्हणून ओळखले जाणाऱ्या दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे.गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात तेल पामतेल दुधाची पावडर आणि मेलामाइन यासारखे विषारी रसायने मिसळून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा गोरख धंदा दूध संकलन करणाऱ्या मंडळीने मांडणी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे दुधात मोठ्या प्रमाणात विषारी पदार्थ मिसळून दररोज लाखो रुपये मिळवणारी आपल्या जिल्ह्यात अशा पांढऱ्या बोक्यांची टोळीच माजली असल्याचे धक्कादायक चित्र समोर शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून दूध उत्पादक करीत आहेत परंतु गेल्या काही वर्षापासून जिल्हा दूध संघाच्या बरोबर इतर खाजगी संस्था सोलापूर जिल्ह्यामध्ये दूध संकलन आणि दूध प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे गोरगरिबांचे पूर्णान्न असलेल्या दुधाच्या या गुणवत्तेवर आणि विश्र्वासार्हतवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे जिल्ह्यात लाखो लिटर दुधाचे संकलन होत असल्याने ही गेल्या काही वर्षात अन्नभेसळ विभागाची कोणतीही कारवाई न झाल्याचे सर्वकाही अलबेल आहे गोलमाल आहे हे नक्की सांगता येत नाही लहान बालकापासून पर्यंत पर्यंत वृद्ध नागरिकापर्यंत प्रत्येकाच्या आहारात हमखास आढळणारा अन्नपदार्थ म्हणून ओळख असलेल्या दुधात सध्या या युरिया दूधाची पावडर आणि अन्य आरोग्य सार्थक आरोग्यास घातक रसायने मिसळून दुधाचा गोरखधंदा मांडलेल्या पांढरपेशा बोक्यावर प्रशासनाने करडी नजर ठेवून दुधात भेसळ होणार नाही याकडे अन्नभेसळ प्रशासनाने लक्ष देणे खूप आवश्यक बनले आहे गेल्या काही महिन्यापासून दुधात भेसळ करण्याचा धंदा आपल्या जिल्ह्यात तेजीत असल्याचे बोलले जात आहे सध्या दूध भेसळ करण्याचे प्रमाण आणि संबंधित प्रशासनाच्या कारवाईकडे पाहता पांढरपेशा बोक्यावर हा गोरखधंदा प्रशासनाच्या वरदास्ताने तरी सुरू नाही ना असाच प्रश्न आत्ता सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे… भेसळयुक्त दूध म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे जिल्ह्यातील सामान्य व नोकरदार नागरिकांतून बोलले जात आहे अन्न व औषध प्रशासनाने दुधाच्या शुद्धतेवर लक्ष ठेवून सामान्य लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवावा आणि दररोज दुधात हजारो लिटर भेसळ करून त्यातून लाखो रुपये मिळवून स्वतःचे उखळ पांढरे करणार आली टोळीच्या मुसक्या अवळाव्या अन्यथा प्रशासनाने यावर 15 दिवसात तोडगा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विधानभवनावर 26जुलै ला रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे… यावेळी निवेदन देताना उपजिल्हाधिकारी वाघमारे साहेब, बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ‌ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले व जिल्हा उपाध्यक्ष रामदास खराडे,सुजय मोटे, औदुबर सुतार, तानाजी सोनवले, रामेश्वर झांबरे, आदी सर्व दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here