दि.९ नोव्हेंबर ला केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या विरोधात बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने “मुंडन आंदोलन”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

केन्द्र व राज्य शासनाच्या विरोधात दि.९ नोव्हेंबर ला बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुपारी एक वाजता ” मुंडन आंदोलन ” करणार आसल्याची माहीती बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल ओहोळ यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष महादेव गाडे,उपाध्यक्ष नितीन वाघमारे, येताळा ओहोळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे.

दिलेल्या निवेदनात खाली दिलेल्या

१) एस. सी. एस. टी. वरती होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात.

२) अ) मागासवर्गांचे दि.०७/०५/२०२१ च्या शासन निर्णयानुसार रद केलेले ३३४ आरक्षण मा. सर्वोच न्यायालयाच्या १७/०५/२०१८ व ०५/०६/२०१८ केंद्र सरकारच्या दि. १५/०६/२०१८ च्या आदेशाप्रमाणे मा. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून पदोनती.

ब) मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून मागासवर्गियांचे पदोनती बंद करण्यास कारभूत असलेल्यावर अॅट्रोसिटी तसेच आरक्षण अधी नियम कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करावे. क) मंत्री गट समितीच्या अध्यक्ष पदी असलेले मागासवर्गीय मंत्री अजित दादा पवार यांनी मागासवर्गियांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्कासित करून मागासवर्गिय मंत्री यांची नियुक्ती करावी.

३) मागासवर्गिव वरील जातीयवादी अत्याचाराच्या केसेस चालविण्यासाठी तालुकास्तरावर जलदगतीने स्वतंत्र न्यायालय निर्माण करावे.

४) मंत्री गट समितींच्या २००६ शिफारशी प्रमाणे ओबीसींना ही पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागु करावे.

(५) ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासाठी तात्काळ आयोग नेमावा.

६) पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात.

(७) शेतकरी व घरगुती वीजबील माफ न करणाऱ्या सरकारविरोधात. (८) ओ.बी.सी. जातिनिहाय जनगणना न करणाऱ्या जातीयवादी सरकारविरोधात

(९) ईव्हीएम मशीन बंद न करणाऱ्या लोकशाही विरोधी सरकारविरोधात दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत भुमिहीणांना तात्काळ जमिनींचे वाटप करावे.या मागन्या मान्य न झाल्यास मुंडन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here