श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ सालच्या २९ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ शुक्रवार दि.२५ मार्च २०२२ रोजी दु.४ वाजता कारखान्याचे चेअरमन मा. आ. श्री समाधान आवताडे यांचे शुभहस्ते व व्हा.चेअरमन मा।श्री अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. तत्पूर्वी दु.३ वाजता कारखान्याचे संचालक मा।श्री रामकृष्ण चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. सुभद्रा चव्हाण या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री रमेश गणेशकर यांनी दिली. चालू गळीत हंगामामध्ये आजअखेर कारखान्याने १२६ दिवसांमध्ये एकूण ३,८४,२०० लाख मे.टन गाळप करुन ३,९५,९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे.
तसेच सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के असा मिळाला असुन आपला साखर कारखानासोलापूर जिल्ह्यामध्ये साखर उता-यामध्ये दुस-या क्रमांकावर राहिला आहे. कार्यक्षेत्रातील सभासद,बिगरसभासदांचा संपुर्ण ऊस गाळप करुनच सांगता
समारंभाचे आयोजन केले आहे. या हंगामाकरिता सोलापुर जिल्हयात मोठया प्रमाणात ऊसाच्या लागणी झालेल्या होत्या. तसेच ऊसाचे एकरी टनेज वाढलेले असताना ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कमी असल्यामुळे सर्वच कारखानदारांना ऊस गाळप करणे अडचणीचे झाले आहे. दामाजी कारखान्याचे चेअरमन मा. आमदार श्री समाधान आवताडे व मा.संचालक मंडळाच्या कुशल नियोजनामुळे यावर्षी चांगले गळीत झाले आहे. तसेच या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेकदार,सिझन कंत्राटी ठेकेदार,माल पुरवठा करणारे व्यापारी,साखर खरेदी करणारे व्यापारी,पत्रकार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे ऊस गळीत हंगाम यशस्वी करुन शकलो असे प्र. कार्यकारी संचालक यांनी सांगितले सदरच्या गळीत हंगाम सांगता समारंभासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.