दिवाळीला पंतप्रधानांच्या हस्ते टर्मिनल बिल्डिंगचे लोकार्पण ; खासदार धनंजय महाडिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

येत्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर बांधण्यात आलेल्या टर्मिनल बिल्डिंग चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी धनंजय महाडिक यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावरून आठवड्यातील सातही दिवस मुंबई विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. कोल्हापूर मुंबई विमान विमान सेवा सुरू झाली असून आठवड्यातील साथ ही दिवसांबरोबरच या विमानामध्ये बिझनेस क्लास उद्योजक व्यावसायिक व्हीआयपी आमदार खासदार यांच्यासाठी उपयुक्त ठरणार असून यामुळे कोल्हापूर विमानतळावरील सेवेचा दर्जा उंचावला आहे.यावेळी बोलताना महाडिक पुढे म्हणा म्हणाले की, अनेक अडचणींमुळे टर्मिनल बिल्डिंग चे बांधकाम साडेचार वर्षाहून अधिकार लांबले. परंतु आता प्रतीक्षा संपली असून नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने आपल्या पाठपुराव्याला यश आले असून २२५ कोटी रुपये खर्चाच्या टर्मिनल बिल्डिंग चे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार असून अद्याप त्यांची तारीख मिळाली नसल्याचे महाडिक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले तसेच उडान पाच योजनेअंतर्गत कोल्हापूर विमानतळावरून शिर्डी, दिल्ली ,अहमदाबाद, कोलकत्ता यासह देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून कोल्हापूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्याचे ही आपले स्वप्न असल्याचे सांगितले. सध्या कोल्हापूर विमानतळावरून दररोज सहा विमानांची ये-जा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळीस्टार एअर चे मनु आनंद, विमानतळ संचालक अनिल शिंदे ,संदीप सुरेश, आलोका, नंदकुमार गुरव आदी उपस्थित होते.
कोट
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर मुंबई विमानसेवा दररोज सुरू झाल्यामुळे आमच्यासारख्या युवा उद्योजकांना मुंबई व बेंगलोर प्रवासासाठी चांगली सोय झाली असून मुंबई आणखीन समीप आली आहे.

अमरेंद्र महाडिक
प्रथम प्रवासी

चौकट-
उडान च्या पलीकडे उड्डाण
सुरुवातीचे बरीच वर्षे प्रतीक्षेनंतर २०१८ साली कोल्हापूर विमानतळाचा समावेश ‘उडान’ योजनेत समाविष्ट केल्यानंतर विमानतळाच्या कायापालट होऊ लागला. उडान योजने मुख्य उद्देश ‘उडे देश का आम नागरिक’ (UDAN) या घोषवाक्याने प्रेरित असला तरीही कोल्हापुरातून विमानसेवेला सर्व स्तरातील प्रवाशांच्या मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम नागरिक बरोबरच आता बिजनेस क्लास या वैशिष्ट्यपूर्ण सेवेचा प्रारंभ झाल्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर विमानसेवेच्या कक्षा विस्तारण्याच्या पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर भविष्यात ही कोल्हापूर विमानतळ हे देशातील एक अग्रगण्य विमानतळ म्हणून नावाला येण्याच्या अशा निर्माण झाल्या आहेत.

चौकट-

सध्या विमानसेवा सुरू असलेलेE175 जातीचे हे विमान दुसरे सर्वात मोठे विमान असून या विमानाची आसनक्षमता त्यात 81तर प्रवासी इतकी आहे त्याचबरोबर यामध्ये बारा असणे ही बिझनेस क्लास दर्जाची आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here