दिपक आबा चंदनसिवे यांनी घेतली नितीन गडकरी यांची थेट भेट (केली रस्त्या बाबत थेट तक्रार दाखल)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मौजे शंकरगांव ते नळी या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण झालेच नाही. हीच बाब आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटक सचिव दिपक चंदनशिवे आणि केशव ठाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष कदम, बंडू बाबर यांनी देशाचे भूतल परिवहन राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.

या रस्त्याच्या कामासाठी अंदाजे ५ कोटीचा निधी तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नितीन गडकरी यांनी संबंधितांना तातडीने लक्ष घालण्याचे आदेश यावेळी दिले आहेतं.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here