दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

आज करमाळा येथे ऊसबिलांबाबत जाब विचारण्यासाठी आमचे करमाळ्याचे पदाधिकारी गेले असता मकाई साखर कारखान्याचा चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व इतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.. ऊसबिले न देता कारखाना सुरू असल्याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः व गुंडांकरवी जी मारहाण केली आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.. विशेष म्हणजे हे चेअरमन शिवसेनेचे नेते आहे.. मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब आपले मुजोर कार्यकर्ते वेळीच आवरा.. सत्तेची ही मस्ती नक्कीच उतरवली जाईल.. राज्यभरातील स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांसह आम्ही दिग्विजय बागल ला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही..
हा माज नक्कीच उतरवला जाईल.. स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी विजय रणदिवे करमाळ्याचे पदाधिकारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.. दिग्विजय बागलांना नक्कीच शेतकरी व सभासद धडा शिकवतील..
– तानाजीराव बागल
जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापुर जिल्हा

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here