दिंडी मधे सोबत असणाऱ्या 22 वारकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून एक पाऊल मागे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिंडी मधे सोबत असणाऱ्या 22 वारकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून एक पाऊल मागे

पोलीस स्टेशन मध्ये अधर्मी सरकारकडून आलेल्या अन्नाचा केला त्याग

लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये 22 वारकऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले व सरकारच्या वतीने आपली भोजनाची व्यवस्था आम्ही करणार आहे असे सांगण्यात आले पण सर्व वारकऱ्यांनी सरकारकडून आलेल्या भोजन व्यवस्थेला नकार दिला कारण ज्या अधर्मी सरकारने वारकऱ्यांचा प्राण पायी वारी रद्द केली त्यांचे अन्न सेवन करणार नाही म्हणून दिंडीमध्ये रीतसर ज्यांचे अन्नदान होते त्यांनी पार्सल स्वरूपात भोजनाची व्यवस्था थेट पोलीस स्टेशनमध्ये आणून दिली

देवाच्या दरबारात न्याय आहे पण उशिरा आहे हे सरकारने विसरू नये
पंढरपूरची पायी वारी करणे हा वारकऱ्यांचा नैतिक अधिकार आहे पण महाराष्ट्र सरकार हेतुपुरस्कर धार्मिक कार्यक्रमावर बंदी आणत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलेले आहे आणि आळंदी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा मध्ये बंडातात्या कराडकर ,गणेश महाराज शेटे, सुधाकर महाराज इंगळे आणि इतर बऱ्याच महाराज मंडळींना पोलीस बळाचा वापर करून स्थानबद्ध केले आणि त्यांची पायी वारी होऊ दिले नाही हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेल आहे राजकीय सर्व कार्यक्रम राजरोजपणे चालू आणि धार्मिक, कार्यक्रमावर बंदी हे पाहून अस म्हणावे लागेल रावण, कंस ,हिरण्यकश्यप ,मौगल शाही यांच्या काळातही धार्मिक कार्यक्रमाला जो विरोध नसेल तो महाराष्ट्र सरकार करून दाखवत आहे पण असं म्हणतात भगवान के घर देर है अंधेर नही आमचा आमच्या पांडुरंगावर विश्वास आहे मोगलाई जास्त दिवस टिकणार नाही
आणि आज आम्ही सुद्धा सरकारच्या दडपशाहीला न जुमानता पंढरपूरच्या वाटेने पाच किलोमीटर का होईना पायी दिंडी सोहळा करून दाखवला याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे

आषाढी पायी दिंडी सोहळ्याच्या च्या करीता वेळोवेळी सरकारला पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारची उत्तर न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून महाराज मंडळी आज पहाटे हडपसर येथून पंढरपूर करिता माझी वारी माझी जबाबदारी या अभियानांतर्गत 100 वारक-यांच्या समवेत कोरोना चे सर्व नियम पाळून पायी दिंडी सोहळा काढण्यात आला होता

पण दिवेघाटाच्या दरम्यान पोलिसांनी दिंडी अडवली व गणेश महाराज शेटे व सुधाकर महाराज इंगळे यांच्यासह 22 वारकऱ्यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आणि वारकऱ्यांनी पोलीस स्टेशन मध्ये भजन आंदोलनाला सुरुवात केली

पोलिसांची वागणूक अतिशय मावळ पद्धतीचे होती पण पायी वारी सरकारच्या निर्देशा शिवाय आपणास करता येणार नाही ही विनंती पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली
वारकर्‍यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही तर सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील हे सांगण्यात आले
म्हणून गुरुवर्य बंडातात्या कराडकर व काही वरिष्ठ महाराज मंडळींच्या सांगण्यावरून व संघटनेच्यावतीने सोबत असणाऱ्या इतर वारकऱ्यांवर नाहक गुन्हे दाखल होऊ नये सामंजस्याची भूमिका घेऊन आज आम्ही पायी दिंडी सोहळा करणार नाही हे सांगण्यात आले

आज आम्ही शांत झालो पण पायी दिंडी सोहळा व्हावा या मतावर आम्ही ठाम आहोत आज झालेल्या निंदनीय प्रकारचा महाराष्ट्रातील सर्व वारकरी जाहीर निषेध करत आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व वारकरी व वारकरी संघटना एकत्र येऊन वारकरी प्रतिनिधी जो निर्णय घेतील त्या निर्णय नुसार आंदोलनाची दिशा ठरविण्यात एईल
पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केलेली उपस्थित वारकरी मंडळी स्वप्निल म कलाल, पुरुषोत्तम महाराज हिंगनकर, योगेश महाराज सुरळकर, ओमकार म वाडकर, संदीप म महाजन, धाऊ म पाटील,अजय म खांडेकर,वामन म नारे, कैलास म ऐलमारे,तेजराव म कदम , रामकृष्ण म लांजेवार, सुभाष म दुमक,शाम म नालींदे, गजानन म सुरवासे, साहेबराव म झोरे,हरी म लोंढे गुरुसिध्ध म गायकवाड

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here