दामाजी कारखान्याच्या संचालका विरोधात बिनबुडाचे आरोप केल्यामुळे दामोदर देशमुख यांची अरळी येथील सभा उधळली – अॅड. राजाराम ए. चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

मंगळवेढा- मौजे अरळी येथे दामोदर देशमुख आणि सहकारी यांनी श्री संत दामाजी कारखान्याची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून ऊस उत्पादक शेतकरी यांचेसमोर दामाजी कारखाना व्यवस्थापना विरोधात चितावणीखेर वक्तव्य करीत
असताना गांवातील तरुणांनी सभा उधळून लावलेचे अॅड।राजाराम चव्हाण यांनी सांगितले। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाची निवडणुक लवकरच होणार असून कारखाना संचालक मंडळाविरोधात बिनबुडाचे आरोप करत दामोदर देशमुख आणि सहकारी तालुक्यातील गांवोगांवी सभा, बैठका घेत आहोत।  सभेसाठी पाच दहा शेतकरीसुध्दा जमा होत नाहीत।  त्यामुळे तारतम्य सोडून कारखान्याचे चालु संचालक मंडळाविरुध्द तोंडात येईल तसे सभामध्ये बोलतात। यापुर्वी अनेक गांवात त्यांच्या सभा झाल्या आहेत।  ग्रामीण भागातील लोक करमणुक म्हणून त्यांच्या सभा ऐकण्यासाठी जमा होतात व त्यांचे बोलणे हसण्यावारी घालवतात।  परंतु अरळी, सिध्दापूर, रहाटेवाडी, तामदर्डी येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस उत्पादक असून त्यांना दामाजी कारखान्याबद्दल मोठ्या प्रमाणात आपुलकी आहे। 
दामाजी कारखान्याविरोधात बोललेले ते कदापी खपवून घेत नाहीत।  विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ दामाजी कारखाना बंद पाडून लिक्वीडेशनमध्ये काढण्याचे काम करीत आहेत।  तसेच कारखान्याचे वकील
अùड।राजाराम चव्हाण हे विद्यमान संचालक मंडळाला कारखाना बंद पाडणेसाठी
मदत करीत आहेत असे दामोदर देशमुख अरळी येथील सभेत बोलताना म्हणाले कारखान्याबाबत दोन मिनीटात याबाबतची माहिती देतो मला माईकवर बोलणेची संधी
मिळावी अशी विनंती केली असता श्री।देशमुख यांनी मला अपशब्द वापरले। त्यामुळे गांवातील तरुण सभासद शेतकरी यांनी देशमुख यांच्या हातातील माईक हिसकावून घेतल्याने सभेत गोंधळाचे वातावरण तयार झालेने देशमुख व त्यांचे सोबत आलेले अॅड।भारत पवार, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम कुदळे, तामदर्डीचे बागायतदार विठ्ठल आसबे, माचणुरचे सुनिल डोके तर दामाजी कारखान्याचे माजी संचालक श्री।यादाप्पा माळी, रमेश भांजे इत्यादी सहकारी सभा अर्धवट सोडून निघून गेले असलेची माहिती अॅड।राजाराम चव्हाण यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here