दामाजी कारखान्याची सन 2019-20 ची 32 वी वार्षिक सभा ऑनलाईन संपन्न
लवकरच डिस्टीलरी प्रकल्प उभारणी करणार-मा.आ.श्री.समाधानदादा आवताडे
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर लवकरच 45 केएलपीडी क्षमतेची डिस्टलरी उभारुन 100 ते 150 बेरोजगार तरुणांना रोजगार देणार असल्याचेे मत चेअरमन मा.आमदार श्री.समाधानदादा आवताडे यांनी व्यक्त केले.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची 32 वी ऑन लाईन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 1 ऑगस्ट,2021 रोजी सकाळी 11.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सुरुवातीस श्री संत दामाजीपंत,कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.किसनलाल रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडीवकील व संस्थापक व्हा.चेअरमन स्व.रतनचंद शिवलाल शहा, आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच नुकतेच निधन झालेले सांगोला तालुक्याचे माजी आमदार स्व.गणपतआबा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे हस्ते करुन आदरांजली अर्पण करणेत आली. कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण यांनी अहवाल सालात मयत झालेल्या थोर व्यक्ती,संस्थेचे सभासद व कामगार यांच्या श्रध्दांजलीचा ठराव मांडला.
या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयाला सभासदांनी ऑनलाईन मंजुरी दिली.
आमदार समाधान आवताडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने 8 मार्च,2021 रोजी आदेश काढून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा 31 डिसेंबर,2021 अखेर ऑनलाईन सिस्टिीमद्वारे घेणेबाबत कळविलेनुसार आज सदरची सभा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेत आहोत. सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट वाढत असून ही चिंतेची बाब आहे. तरी सर्वांनी कोरानापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारखान्याकडे एकही उपपदार्थ नसतांना फक्त साखर उत्पादन करुन सन 2020-21 करिता ऊसाची एफआरपी रु.2119.06 प्र मे टन प्रमाणे निश्चित केली आहे.
कारखान्याच्या वाटचालीमध्ये अनंत अडचणी आल्या परंतु आपणा सर्वांची संस्थेवर असणारी निष्ठा व सहकार्यामुळे त्या अडचणीवर मात करुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपल्या कारखान्यावर डिस्टीलरी प्रकल्प लवकरच सुरु करुन बेरोजगार तरुणांना काम मिळणार असून या प्रकल्पातुन इथेनॉल,स्पिरीट,अल्कोहोल निर्मिती होवून कारखान्यास अतिरिक्त उत्पन्न सुरु होणार आहे त्यामुळे शेतकयांना ऊसास जादा दर देणे, तोडणी वाहतुकदारांचे बील व कामगारांचे पगार वेळेत करणेसाठी निश्चित मदत होणार आहे.
शुगर सायलो सिस्टिम केल्याने साखर हमाली, साखर पोती शिलाई,नंबरीचे काम यासाठी होणाया खर्चाचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच यामुळे साखरेचे तपमान कमी होवून साखरेची श्ुभ्रता जास्त दिवस टिकणार आहे. सध्या कारखान्यावर असणारी शेतकयांची निष्ठा, सभासदांचा विश्वास व कामगारांचे प्रेम यामुळेच फक्त साखर उत्पादनावर आपला कारखाना चालतो.
अडचणीवर मात करुन शेतकयांच्या ऊसाचे राहिलेले बिल व कामगारांचा पगार लवकरच अदा करण्यात येणार आहे. कारखान्यामध्ये नवीन कुलींग टॉवर दोन स्टेजमध्ये बसवला असल्याने गरम पाणी थंड करुन परत प्रोसेसमध्ये वापरले जाते. त्यामुळे जॅकवेलपासुन कारखान्यापर्यंत पाणी आणण्यासाठी होणाया लाईट बिलाचा खर्च कमी होत आहे.
आपला कारखाना दुष्काळी परिस्थितही चांगला चालला. जिल्हयातील 70 टक्क्े कारखाने बंद होते. तरी सुध्दा आपला कारखाना सुरु होता. शेतक-यांचा राजवाडा जपण्याचे काम ज्याप्रमाणे आमचे आहे त्याचप्रमाणे सभासद व कामगारांचे सुध्दा आहे.
अशोक केदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पुढे बोलताना म्हणाले की, कारखान्याची उभारणी स्व.कि.रा.मर्दा उर्फ मारवाडी वकील, स्व. रतनचंद शहा, यांनी केली. चेअरमन सर्व संचालक मंडळ व सर्व सभासदांना समान वागणुक देत आहेत. जनतेच्या काळजातील आमदार, काटकसरीचे संचालक मंडळ व नावाप्रमाणेच कार्यकुशल कार्यकारी संचालक असल्यानेच आतापर्यंत आम्ही आमचे मार्गदर्शक चेअरमन मा.समाधानदादा आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून सध्या कामकाजामध्ये आम्ही अत्यंत काटकसर,पारदर्शकता,चिकाटी ठेवलेली आहे. स्व.कि.रा.मर्दा उर्फ मारवाडी वकील, स्व. रतनचंद शहा, स्व.सुधाकरपंत परिचारक, स्व.चरणुकाका पाटील, प्रा.लक्ष्मणराव ढोबळे आणि बबनराव आवताडे यांनी कारखान्यास दिलेल्या योगदानामुळेच कारखाना प्रगती पथावर आहे.
तसेच कारखान्याचे सभासद शशिकांत चव्हाण व प्रा.येताळा भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे यांनी चेअरमन समाधान आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेबद्दल सर्व सभासद व कामगारांचे वतीने अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच या विजयामध्ये मा.आमदार श्री.प्रशांत परिचारक व परिवाराने योगदान दिलेबद्दल त्यांचेही सभासदांच्यावतीने आभार मानले. त्यास संचालक राजीव बाबर यांनी अनुमोदन दिले.सर्व सभासदांनी त्यास ऑनलाईन मंजुरी दिली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक झंुजार आसबे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील विषयांना सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे टाळयांच्या गजरात मंजूरी दिली. अतिशय अडचणीतुन मार्ग काढून कारखान्याचे चेअरमन आमदार समाधानदादा आवताडे यांनी अत्यंत काटकसरीने कारभार करुन पैसा उपलब्ध करुन कारखान्याचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरु ठेवले आहे. कारखान्याचे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालक व चेअरमन यांनी समाधानकारक व योग्य अशी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक बबनराव आवताडे, भुजंगराव आसबे, महादेव लवटे, संजय पवार, मारुती थोरबोले आदि ऑनलाईन तर लक्ष्मण जगताप, राजेंद्र पाटील, शिवयोग्याप्पा पुजारी, बापू काकेकर, बसवेश्वर पाटील, रामकृष्ण चव्हाण, लक्ष्मण नरुटे, सुरेश भाकरे संचालिका सौ.स्मिता म्हमाणे, सौ. कविता निकम, विजय माने, तसेच भारत निकम, प्रमोदकुमार म्हमाणे प्रत्यक्ष सभेस उपस्स्थित होते. याशिवाय सह.संस्थांंचे प्रतिनिधी, सभासद,पत्रकार,कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. सभा तब्बल दीड तास शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ऑनलाईन सभेस कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शेती विभागाकडील कर्मचा-याना सुचना देवुन ऑनलाईन मोबाईलवर सभा पहाण्यासाठी व्यवस्था केली होती. सभा व्यवस्थीतपणे पार पाडणेसाठी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कारखान्याचे संचालक मा.श्री. बाळासाहेब शिंदे यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
आजचे वार्षिक सभेतील विषय क्र.10 अन्वये क्रियाशिल सभासदत्वासाठी पोटनियम व कायदयातील असणाया ऊस पुरवठा व सभेस उपस्थितीची अट शिथिल करणेबाबत शासनास शिफारस करणेच्या विषयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व सभासदांचे क्रियाशिल सभासदत्व अबाधीत राहणार आहे.