दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के निकालासह मुलींची बाजी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उर्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 6.06 टक्के इतके आहे.
अर्थात परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा यंदाचा निकाल 99.27 टक्के लागला आहे.
विभागवार निकाल – पुणे 96.96, नागपूर 97.00, औरंगाबाद 96.33, मुंबई 96.94, कोल्हापूर 98.50, अमरावती 96.81, नाशिक 95.90, लातूर 97.27, कोकण 99.27.
कुठे पाहता येईल निकाल? 
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here