त्या घटनेबद्दल मोहोळ पोलिसांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे:- माऊली हळणवर (लोकनेते आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचे आयोजन)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ पोलीस ठाण्यात दि.१७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता एक पीडित युवती तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. मात्र दि.१८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजनेच्या दरम्यान ती पीडित युवती तिच्या घरी गेली. एवढा वेळ घेऊनही त्या पीडितेची तक्रार दाखल का झाली नाही. असा सवाल करीत आणि जर ती पीडित एका सुसंस्कृत राजकीय व्यक्तीला बदनाम करून ब्लॅकमेल करीत आहे.असे पोलिसांना वाटत होते.तर मग पिडितेवर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही.? यामुळे पोलिसांच्या माध्यमातून प्रस्थापितांची होत असलेली दलाली, मांडवली व दादागिरी थांबविण्यासाठी मोहोळ पोलिसांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अन्यथा बहुजन हृदयसम्राट लोकनेते आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ पोलीस ठाण्यावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपा किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी माध्यमांशी बोलताना केले.

मोहोळ येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बहुजनांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून माऊली भाऊ हळणवर बोलत होते.प्रारंभी याबाबत घटनेबाबत इतरांनी आपले विचार मांडले होते. पुढे माऊली भाऊ हळणवर म्हणाले की,ती पीडित सकाळी ११ पासून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बसते,आणि पोलीस मात्र तिला एका खोलीत बसवून वेळ घालवतात आणि समोरच्या पार्टीला संधी देतात.ही बाब संशयास्पद आहे.त्यामुळे दि.१७ जानेवारी व दि.१८ जानेवारी या दोन्ही दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे.तर त्या दिवशी ज्या पोलिसांनी हे सर्व घडवून आणले आहे.त्यांचे कॉल डिटेअल्स व सीडीआर तपासणे ही गरजेचे आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जर ती पिडीत एका सुसंस्कृत बड्या राजकीय नेत्याच्या सुसंस्कृत पोराला ब्लॅकमेल करीत होती.असे पोलिसांच्या साक्षीने घडत होते. तर मग पोलिसांनी त्या पिडितेवर ब्लॅकमेलिंग चा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. ते ही पोलिसांनी केले नाही.मोहोळ पोलिसांनी प्रस्थापितांच्या हातचे बाहुले होऊन केवळ दलाली व मांडवली केली आहे.असे या मिळालेल्या माहितीनुसार दिसते आहे.त्यामुळे दि.१७ जानेवारी च्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे असे निवेदन सोमवारी दि.२३ रोजी पोलीस अधीक्षक सोलापूर व पोलीस निरीक्षक मोहोळ यांना देण्यात येईल.जर या निवेदनावर चार,पाच दिवसात काहीही माहिती दिली नाही.तर मात्र लोकनेते आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी व जनतेतून जागृती व्हावी यासाठी भव्य असा मोठा मोर्चा काढला जाईल असे ही शेवटी माऊली भाऊ हळणवर म्हणाले.

यावेळी माऊली हळणवर, सुभाष मस्के, सुनील पाटील, संजय क्षीरसागर ,श्रीकांत लांडगे ,ब्रह्मदेव उर्फ फंटू गोपने, दीपक पुजारी, कृष्णदेव वाघमोडे, औदुंबर वाघमोडे, लिंगराज शेंडगे, बंडू गडदे, राम तरंगे , राजेंद्र वाघमोडे, मोहन शेंडगे, नितीन काळे ,पांडुरंग वाघमोडे ,बापूसाहेब कोरे आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here