त्यांच्या वक्तव्याला कुणीही महत्व देऊ नये – आ. प्रणिती शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

त्यांच्या वक्तव्याला कुणीही महत्व देऊ नये – आ. प्रणिती शिंदे

सोलापूर // प्रतिनिधी

मुलीच्या मंत्रिपदाला अडथळा होईल म्हणून कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनीच सिद्धाराम म्हेत्रे यांना निवडणुकीत पाडले. आपला विरोधातील उमेदवार कोण असावा, हेही शिंदेच ठरवत होते, असा आरोप भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांनी रविवारी (ता. 1) एका कार्यक्रमात केला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अडगळीत पडलेले ढोबळे या वक्‍तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पाथरुट चौकातील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ढोबळेंनी कॉंग्रेसवर विशेषत: सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यावर उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी, त्यांना एवढे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी, “कॉंग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात’ या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप व भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा खरपूस समाचार घेत ढोबळे म्हणाले, “ताई, तुम्ही एकदा शहर मध्य सोडून शहर उत्तरमध्ये निवडणूक लढवा, एकदा होऊन जाऊ द्या’. “शहराच्या पाणी प्रश्‍नावर कॉंग्रेसला बोलण्याचा अधिकार नाही, आम्ही दुहेरी पाइपलाइन करून दाखवू’, असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले. त्यावर कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ढोबळे यांच्यावर जोरदार टीका केली.

चौकट

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना मुलाप्रमाणे मानतात. ज्या पक्षाने लक्ष्मण ढोबळेंना मोठे केले, त्या पक्षाला सोडून पक्षांतर करणाऱ्या ढोबळेंना लोक चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून शहराकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. चापलुसगिरी करणाऱ्या ढोबळेंना हे बोलणे शोभत नाही.

– प्रकाश वाले, शहराध्यक्ष, कॉंग्रेस,सोलापूर

 

.आ. प्रणिती ताई शिंदे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार लक्ष्मणराव ढोबळे यांना कोणी दिला त्याच बरोबर ज्या डोळीन इतकी वर्षे मंत्रीपद आमदारकी भोगली त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील किती सिंचनाच्या पाण्याचे प्रश्न सोडवले त्याच बरोबर मंगळवेढा तालुका साठी त्यांनी आत्तापर्यंत काय काम केले हे त्यांनी फक्त जनतेला दाखवून द्यावे असे माझे त्यांना जाहीर आवाहन आहे.

– चेतन नरोटे, काँग्रेस नेते सोलापूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here