तेजस्विनीचे ऑनलाईन महिला शिबिर संपन्न…

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

पुणे :- दिवसेंदिवस सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे घटत जाणारे प्रमाण पाहता महिलांना उद्योजकतेचे पुढे आणण्याकरिता, तेजस्विनी महिला संस्था,लोणी काळभोर, पुणे यांच्यातर्फे आयोजित तेजस्वी झेप अंतर्गत महिला उद्योजिकांसाठी उद्योजकतेच्या यशाची गुरुकिल्ली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हे तेजस्विनीचे दुसरे यशस्वी ऑनलाईन शिबीर होते. तसेच यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ५० महिलांनी आपला उत्फूर्त सहभाग नोंदविला होता.या शिबीरात नाव नोंदणी करणाऱ्या सहभागी महिलांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे आयोजन तेजस्विनी अध्यक्षा- श्रीमती शुभांगीताई राजकुमार काळभोर, तेजस्विनी मार्गदर्शक सौ. संगीताताई काळभोर, तेजस्विनी सल्लागार डॉ. अलका नाईक, सौ. जयश्रीताई नांदे, तेजस्विनी सहायक, मुख्याध्यापिका सौ. संगीताताई लंघे, तेजस्विनी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व उत्कृष्ट आयोजन केले. १७ जुलै २०२१ रोजी हे शिबिर उत्कृष्टरित्या पार पडले.तसेच व्यवसाय निर्मिती आणि व्यवसाय मार्केटिंग यासंदर्भात एक ऑनलाईन वेबिनार/ शिबिर गुगल मीट या ॲपद्वारे घेण्यात आले. यामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी साधुन महिलांनी आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले.या शिबिराचे आदरणीय मार्गदर्शक पुढीलप्रमाणे होते.श्रीमती माधुरी गुजराथी,पुणे
उद्योजिका,समाजसेविकामार्केटींग क्षेत्रातील मार्गदर्शक श्रीमती अंजली एस.नक्षत्र,मुंबई महाराष्ट्र प्रेंसीडेंट (वुमन सेल) भारतीय भ्रष्टाचार कमिटी (Anti courruption Committee) ह्युमन राईट्स महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी नक्षत्र ऐक्झिबीशन फाऊंडर ,
डॉ.अलका नाईक मुंबई, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, प्राध्यापिका, लेखिका, कवयित्री, या सर्व मान्यवरांनी महिलांच्या सर्व प्रश्नांना समर्पकपणे सर्वांना समाधान मिळेल अशी अभ्यासपूर्ण व अनुभवपूर्ण उत्तरे दिली. अनेक महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेऊन, आपल्या शंकांचे निरसन करून घेत आपल्या वेळेचा सदुपयोग करून घेतला.अशा प्रकारे उत्कृष्ट असे हे शिबिर पार पडले,असे संस्थेच्या कार्यक्रम समितीच्या सदस्या सौ.मनिषा कडव यांनी कळविले आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here