तुळजाभवानी नगर येथे 21.69 लाखाचे रस्ते काँक्रिट करणे या विकास कामांचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भुमिपुजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

सोलापूर शहरातील तुळजाभवानी नगर येथील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत होते. यामुळे सदर भागातील नागरीक, विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरीता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी नागरीकांनी सदरचा रस्ता करण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी सदर परिसरामध्ये भेट देवून पाहणी केली व तात्काळ महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सोयी सुविधांचा विकास सन 2019-2020 या योजने अंतर्गत 1) प्र.क्र. 11, तुळजाभवानी नगर, अक्कलकोट रोड येथे मंगरुळे घर ते औरसंग घरापर्यंत रस्ता काँक्रिट करणे. (र.रु. 10.69 लाख) व 2) प्र.क्र. 11, तुळजाभवानी नगर, अक्कलकोट रोड येथे काळगी घर ते कोकणे घरापर्यंत रस्ता करणे. (र.रु. 10.69 लाख) हे काम मंजूर करून घेतले व त्याचे भुमिपूजन आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी धोंडप्पा तोरणगी, नागनाथ कदम, राज शिंदे, किरण गायकवाड, सुमित बिराजदार, प्रभाकर गपले, बसवराज पाटील व सदर भागातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here