तालुक्यातल्या ऊसाने शेतकऱ्यांचा गळा दाबला! -लक्ष्मण ढोबळे,माजी मंत्री

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(ऊस उत्पादक कोयत्या बरोबर कसे भांडणार?)
       

विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे साहेब यांनी शेती, सहकार, शिक्षण, पोलीस प्रशासन, अवैध्य धंदे यामध्ये काळजीपूर्वक लक्ष घातले आहे. आज जर विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे यांचे नेतृत्व नसते तर शेतकऱ्याचा मोठा कोलदांडा झाला असता. आज मोठ्या कष्टाने सांभाळलेला ऊस शेतकरी कुणाच्या गव्हाणीत घालणार याची चिंता वाटते. अशा परिस्थितीत जर ऊसाला दरच मिळाला नाही तर उद्या दामाजी कारखाना देखील विठ्ठल कारखान्याचा मावसभाऊ म्हणूनच मिरवणार याची काळजी वाटते. कारण रागावलेला ऊस उत्पादक कोयत्या बरोबर कसा भांडणार? याची असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था साखर धंद्याची झाली आहे. दराडे नांवाचा कुंभकर्ण ऊसाचं क्रशींग आणि साखर उतारा तपासायला पाहिजे. परंतु हप्ते खाऊन झोपलेल्या दराडेला लवकर जाग येत नाही. साखर आयुक्तांनी कानउघडणी केल्यावर देखील सोलापूरचे साखर सहआयुक्त कार्यालय झोपलेले असते.
         आज आमदारांचे नेतृत्व नसते तर शेतकऱ्याची अडवणूक झाली असती. दामाजी 4 हजार टनाने क्रशींग करतो. परंतु आमदारांच्या कष्टामुळेच प्रतिदिनी साडेतीन हजाराचे क्रशींग चालू आहे. तर दामाजीच्या सावलीत तयार झालेले कर्तव्यदक्ष चेअरमन प्रा.काळुंगे सर !सिताराम! 1200 टनाची क्रशींग क्षमता असताना गेली चार महिने कुंटुंबातील सदस्यांनी घरच्या भाकरी बांधून मोठे कष्ट घेऊन अखेर सिताराम महाराजांच्या कृपेने अखेर 2 हजार टनाने क्रशींग चालू केले आहे. अर्थात दामाजी नंतर प्रा.काळुंगे सरांनी यशस्वी कारखानदार म्हणून सिताराम मध्ये नांव मिळविले आहे. प्राध्यापकाचं अभिनंदन करणं हे एका प्राध्यापकाचे कर्तव्यचं आहे. तसेच फॅबटेक तालुक्याच्या अतिरिक्त ऊसाची गरज भागविणारा ठरावा असे समाधान दादांचे स्वप्न होते. त्याची कर्नाटकालाही मदत झाली असती. परंतु फॅबटेक बंद असल्यामुळे प्रतिदिनी सहा हजाराचे क्रशींग थांबले. ऊस तालुक्याबाहेर जाणं देखील अवघड झालं परंतु जादा ऊसाची अवस्थाच मोठी वाईट झाली आहे. तालुक्यात बागायत जमीन तेवढीच असली तरी टनेज वाढल्यामुळे अतिरिक्त ऊसापुढे चारी कारखान्यांनी गुडगे टेकले आहेत. केवळ शेतकऱ्याच्या विकासासाठी मोठ्या तळमळींने चारी कारखाने शेतीला मदत करीत आहेत. अर्थात ऊस दरानेच शेतकऱ्यावरचे कारखानदाराचे खरे प्रेम स्पष्ट होणार आहे.  
            युटोपियन हा अत्यंत अध्यायावत असलेला पांडुरंगाच्या ऊस दराची परंपरा लाभलेला मोठ्या दिमाखात सुरू झाला त्या ठिकाणचे प्रशासन पंतांना आदरांजली म्हणूनच तीन हजाराची क्षमात होती. परंतु मोठ्या कष्टाने प्रतिदिनी साडेचार हजाराचे  क्रशींग करून दोन पोरांनी मिळून चालविण्याचा खटाटोप करीत आहेत. (श्री रूषी आणि श्री रोहन पंतांची तिसरी पिढी राजकपूरचा वारसा सांगत साखर कारखानदारी स्पर्धेत उभी करीत आहेत.) त्याच प्रमाणे भैरवनाथ कारखाना माढ्यातून येऊन मंगळवेढ्यामध्ये नव्या आडतीचे दुकान थाटले आहे. प्रतिदिनी 5 हजाराची क्रशींग क्षमता असताना साडेचार हजाराने चालवून कसलीही तक्रार नाही. अनिल सावंतासारखा मराठी मुलकाचा रांगडा गडी मोठ्या कष्टाने साखर धंदा परतालुक्यात उभा करतो आहे. याचे शेतकरी वर्गात मोठे कौतुक आहे. तालुक्यातल्या चार कारखान्याचा आधार मिळाला नाही तर शेतकरी जकरायाच्या शेजारच्या मावशीला हाक मारतात आणि ऊसाची विल्हेवाट लावतात. हे विशेष आहे. कारण रक्तात उपजतच शेतकरी संघटनेचा जकारायाला मोठा आधार आहे.
           मंगळवेढ्यात ऊस अतिरिक्त असून जुना शेतकरी आणि त्याची नवीन पिढी अधुनिक शेती करताना दिसतात. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून, खताचा वापर करून नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन आमलात आणून शेती तिच आहे पाणी तेवढेच परंतु ऊसाचे टनेज वाढले आहे. यासाठी अतिरिक्त ऊसाचे करायचे काय याबद्दल तालुक्यात चिंता वाढली आहे.
        दोन आमदाराचे मंगुड्यावर लक्ष असून नवाट आमदार म्हणून ताज्या दमाचे समाधान दादा गावागावात जावून लग्नाला हजर राहून सुख दुखाचा साथीदार होवून शेतातल्या ऊसाची सोय लावण्यासाठी मदत करतात हि मोठी समाधानाची बाब आहे.कारण नांवातच समाधान आहे. दोन आमदारांनी मिळून घेतलेला निर्णय निवडणूक प्रचारात आम्ही देखील दामाजी बद्दल मोठं-दांडगट बोलून बसलोय परंतु आता टोळ्या आल्या आणि गेल्या मशनरी जुनी असली तरी मोठी साथ देते आहे. जुना कारखाना असून चांगला चालतो आहे. परंतु टोळ्या मुळेच मोठी अडचण झाली आहे. दुरदृष्टीच्या समाधान दादांनी फॅबटेक सुरू करण्याचा संकल्प केला. त्यामुळे 6 हजाराचे क्रशींग तालुक्याला मदत करणारे ठरले असते. परंतु एकाच वेळी समाधान दादांच्या मागे असलेला व्याप त्यामुळे वाढत्या ऊसाकडे लक्ष देणे थोडे अवघड झाले. यापुढे ऊसा बद्दल दोन्ही आमदारांनी जर लक्ष घातले नाही तर ऊसाची मोठी अडचण होईल. प्रशांत मालक आणि समाधान मालक या उभयतांना भेटून मी विनंती करून वस्तूस्थिती सांगणार आहे. ऊस शेतकऱ्यांची व्यथा ढोबळेनी सांगणे म्हणजे लोहाराच्या घरी सुई विकल्यासारखे होईल. कारण साखर कारखानदारी चालविणाऱ्या समोर एखादा कार्यकर्ता प्रमाणीक भुमिका मांडत असेल तर माझ्या सारखा वादग्रस्त ठरू शकतो. कारण बऱ्याच ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात साखर धंद्यात ! खोट्या नाण्याने अवघा बाजारचं विकत घेतला आहे.!  
     प्रथमच तालुक्यातील सर्व प्रातिनिधीक सहकारी संस्था आणि विद्यमान आमदारकी या गोष्टी एकाच कुटुंबात एकवटल्या आहेत. त्यामुळे या कर्तबगारीचे जिल्ह्यातच मोठे कौतुक होत असून साखर धंद्यापुढे समाधान मालकांनी पारदर्शीपणाचा एक आदर्शच निर्माण केला आहे. कारण विधानसभेत तालुक्याच्या विकासकामावर बोलताना विकास कामावर परिणाम करणारे अवैध धंदे कसे मारक आहेत. याबाबत प्रथमच समाधान दादांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यामूधन शेतकऱ्याबद्दलची तळमळ स्पष्ट झाली आहे. यामुळेच मोठ्या कष्टाने दोन्ही आमदार मोठ्या मजबूतीने तालूका बांधत आहेत. त्यामुळे मारवाडी वकीलाच्या आशीर्वादाने सहकाराच्या ताकदीत वाढ झाली आहे. एकुणच विधानसभेत प्रथमच मंगळवेढ्याचा आमदार अभ्यासपुर्ण व्यक्त झाला हे मंगळवेढ्यासाठी प्रथमच घडले आहे. तसेच जिल्ह्यातले सर्वच साखर कारखान्याचे चेरअमन स्पर्धात्मक दर देतात. तर साखर धंदा परवडत नाही हे माहित असून एका कारखान्याचे पाच कारखाने करतात. त्यातच पारदर्शक मदत म्हणून तसेच केंद्राच्या कृपेने साखरेचा दर 3100रू च असावा. त्यामुळे मदतीची इच्छाशक्ती असून देखील कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला सढळ हाताने मदत करणे चेअरमन समुहाला गरीबाला मदत करणे मोठे अवघड झाले आहे. संधी मिळाल्यावर समाधान दादांनी दामाजी फायद्यात आणायसाठी संकल्प केला. आणि तालूक्याच्या वैभवाला सुरूवात झाली. दामाजीसाठी कोणत्या चेअरमनने किती कष्ट घेतले. याची चर्चा देखील प्रसार माध्यमांनी उघडपणे केली आहे. यातच दुधात साखर म्हणून अस्वानी प्रकल्पाचे भुमि पुजन झाले आहे. समाधान दादांनी मनात आणले तर सहा महिन्यात कारखाना विस्तारीत होऊ शकतो. प्रकल्प प्रगतीपथावर असून उभारणीची प्राथमिक तयारी 2019 पासूनच कामाला सुरूवात झाली आहे. दोन्ही आमदार मिळून काम करतील अशी दामाजी पंताला खात्री आहे. माझ्याबरोबर राजकारणात कुणी आमदार झालं, कुणी कारखान्याचा चेअरमन झालं  मी मात्र प्रचारामुळं शिव्यांचा आणि लाखोलीचा धनी झालो. कारण मला रागाविण्याचा मतदारांना जन्मसिद्ध हक्क आहे. मला दिलेल्या वर्गणीच्या व्याजात देणगीदार रागावून बोलत असतात. याचा मला रास्त अभिमान आहे.  

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here