डॉ.विश्वासराव मोरे Dr.Vishwasrao More यांच्या पशुवैद्यक विश्वातील “विश्वास” पुस्तकाचे Book Publication प्रकाशन व दुर्वांकुर उत्स्फूर्त काव्य संमेलन संपन्न! कधीही न डगमगनारे सर्वांना सोबत घेवून जाणारे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजेच “डाॅ.विश्वासराव मोरे” : चेअरमन मा.श्रीकांत मोरे Chairman Shrikant More

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डॉ.विश्वासराव मोरे यांच्या पशुवैद्यक विश्वातील “विश्वास” पुस्तकाचे प्रकाशन व दुर्वांकुर उत्स्फूर्त काव्य संमेलन संपन्न!

कधीही न डगमगनारे सर्वांना सोबत घेवून जाणारे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजेच “डाॅ.विश्वासराव मोरे” : चेअरमन मा.श्रीकांत मोरे

पंढरपूर येथे डॉ.विश्वासराव मोरे यांच्या लिखीत पशुवैद्यक विश्वातील “विश्वास” पुस्तकाचे प्रकाशन सोहळा व दुर्वांकुर उत्स्फूर्त काव्य संमेलन मंगळवार दि.14/5/2024 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक व मनोरमा को-ओप बॅंकेचे चेअरमन मा.श्रीकांत मोरे,जेष्ठ साहित्यिक मा.प्रा.डॉ.राजेंद्र दास, महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद , सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मा.कल्याण शिंदे, जेष्ठ पत्रकार मा. बाळासाहेब बडवे, संपादिका, जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मा.सौ.राधिका कुलकर्णी , स्वेरी कॉलेजचे सर्वेसर्वा प्राचार्य डॉ .बी.पी.रोंगे सर, माजी सभापती मोहोळ व भीमा कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब क्षीरसागर हे असून पशुवैद्यक विश्वातील “विश्वास” पुस्तकाचे प्रकाशन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगते व्यक्त केली तसेच महाराष्ट्रातून आलेल्या कवींनी कविता सादर करत उपस्थितांचे मन मंत्रमुग्ध केले व प्रत्येकांनी कवितेच्या माध्यमातून एक नवी प्रेरणा दिली.

यावेळी सर्व मान्यवर, पदाधिकारी डॉ.विश्वासराव मोरे यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र, शिक्षक व साहित्यिकांनी उपस्थिती दर्शविली होती.

संस्था सुरू करणे अतिशय सोपे आहे पण चालवणे अवघड हे

माझे शिक्षण झाल्यावर पुणे,नगर अशा अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. आयुष्यात पैसा मिळवण्यापेक्षा अमूल्य असे माणस कमवा असा गुरूमंत्र माझ्या गुरूंनी मलक दिला. एखादी संस्था सुरू करणे अवघड नाही पण संस्था चालवणे आवघड आहे श्रीकांत मोरे यांनी मनोरमा या नावाने संस्था सुरू केली व ती चांगल्या पद्धतीने चालवत मोठ्या नावारूपाला आणली हे धाडस खुप महत्त्वाचे आहे. आयुष्यात धाडस करणे फार महत्त्वाचे

मा. पशुवैद्यकीय अधिकारी विश्वासराव मोरे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here