डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(वीज कामगार संघटना इंटक यांनी राबविला स्तुत्य उपक्रम)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्ह्याचे तथा महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस इंटक संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंटक वीज कामगार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे इंटक भवन अकलूज येथे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या शिबिराचे उद्‌घाटन डॉ.धवलसिंह यांच्याहस्ते करण्यात आले. यामध्ये सुमारे 75 लोकांनी रक्तदान केले. यावेळी अकलूज व सरपंच फडतरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस ह.भ.प. किशोर महाराज जाधव, इंटक संघटनेचे कार्याध्यक्ष, संस्थापक इंटकरत्न आनंदराव पाखरे, समन्वय समितीचे अध्यक्ष नागनाथ पांढरे, सोलापूर जिल्हा इंटक वीज संघटनेचे जनरल सेक्रेटरी राजाराम घुगे, डेप्युटी जनरल सेक्रेटरी तथा प्रसिद्धी प्रमुख एम.डी.जाधव, इंटक संघटनेचे जिल्हा संघटक ह.भ.प. विठ्ठल फड महाराज, जयकुमार वनकुद्रे, उपजनरल सेक्रेटरी युवराज येलगुलवार , दत्तात्रय रूपनवर व जॉईन्ट सेक्रेटरी राहुल शिंदे, सहाय्यक अभियंता स्वप्नील लोंढे, श्री शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन, प्रदिप सुरवसे, संचालक राजकुमार भुईटे, नातेपुते उपविभागाचे उपविभागीय सेक्रेटरी संतोष चव्हाण, पतसंस्थेचे क्लार्क कुलकर्णी, माने व ग्राहक संस्थेचे क्लार्क जम्मा यांच्यासह इंटक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
वीज इंटक संघटनेच्यावतीने वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून रक्तदान शिबीर व इतर सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here