पंढरपूर:- पंढरपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये लहान मुलांचे दैवत म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर शीतल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये लहान मुलांचे हृदयाचे मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येतात ज्या शस्त्रक्रिया मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात केल्या जातात त्या शस्त्रक्रिया आता ग्रामीण भागातील पंढरपूर येथील डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये यशस्वीरित्या अद्ययावत यंत्रसामग्री च्या रूपाने पूर्ण होऊ लागल्या आहेत.
नुकतेच त्यांनी कु. गौरी दत्तात्रय सलगर (वय 12) वर्षे राहणार खरात वाडी तालुका पंढरपूर या मुलीच्या हृदयाला असलेले छिद्रावरील शस्त्रक्रिया ही कोणतीही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे डॉक्टर संतोष जोशी, डॉक्टर शितल शहा, डॉक्टर भोसले व त्यांच्या पूर्ण टीमने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
नवजीवन बाल रुग्णालया मध्ये लहान मुलांसाठी अत्याधुनिक कॅथलॅब सेंटर आहे. मुंबई पुण्यानंतर लहान मुलांसाठी चीरफाड न करता हृदयाचे छिद्र बंद करण्याचे सेंटर सुरू केले आहे. आतापर्यंत 30 ते 40 मुलांचे हृदयाचे छिद्रावरील कोणतीही चिरफाड न करता यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. परंतु व्ही एस डी हे हृदयातील मोठे छिद्र असते यावरील यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर संतोष जोशी यांनी पहिल्यांदाच पंढरपूर मध्ये केलेली आहे. सध्या रुग्णही व्यवस्थित असून अशा प्रकारच्या उपचाराचा नक्कीच पंढरपूर सह तालुक्यातील रुग्णांना फायदा होणार आहे.
त्यामुळे रुग्णांचे पालक व रुग्ण आनंदित असून कमी खर्चामध्ये आता या शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही दत्तात्रय सलगर यांनी केले. दरम्यान डॉक्टर शीतल के शहा यांच्या नवजीवन रुग्णालय मध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री सह कोणतीही चीरफाड न करता शस्त्रक्रियेची व्यवस्था असून याठिकाणी लहान मुलांच्या जन्मजात असलेल्या हृदयातील छिद्रावर यशस्वीरित्या उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येत असून याचा पंढरपूर परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर शीतल शहा यांनी केले आहे.