डाॅ. श्री नामदेव आयवळे यांनी गणेश पाटील यांचा केला यथोचित सन्मान!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

डाॅ. श्री नामदेव आयवळे यांनी गणेश पाटील यांचा केला यथोचित सन्मान!

डॉ. श्री नामदेव आयवळे रा . शेवते ता.पंढरपूर यांना शेतामध्ये काम करत असताना विषारी घोणस जातीच्या सापाने दंश केला होता. श्री गणेशदादा पाटील यांना हि माहीती समजल्यानंतर लगेच भोसे येथिल श्री जाफर शेख यांच्या गाडीतुन भोसे ते पंढरपूर येथे १२ मिनीटात दवाखान्यात पेशंट पोच केले व तत्परतेने डॉ. बोरावके यांना फोन करुन उपचार यंत्रणा सज्ज ठेवली व पुढील उपचार वेळेत झाल्यामुळे आज डॉ. नामदेवआयवळे उपचार घेऊन घरी सुखरुप आलेले आहेत. आज भोसे ग्रामपंचायत कार्यालय येथे डॉ. श्री नामदेव आयवळे यांनी श्री गणेशदादा पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉ. सोलापूर ग्रामीण यांचा व वाहनचालक श्री जाफर शेख यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थीत श्री बाळासाहेब आयवळे, डॉ. श्री. अकुंश केंगार, श्री माउली केंगार, श्री विशाल आयवळे, श्री शिवराम कोरके, डॉ. श्री युवराज श्रीखंडे, व भोसे ग्रामस्थ उपस्थीत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here