ठाकरे सरकार हे गरीब व कामगारांचे सरकार आहे :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ठाकरे सरकार हे गरीब व कामगारांचे सरकार आहे :- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार गरीब व कामगारांसाठी विविध योजना राबवुन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत . म्हणूनच ठाकरे सरकार हे गरीब व कामगारांचे सरकार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या घरेलु कामगारांच्या बैठकीत बोलतांना केले .
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियाना अंतर्गत घरेलू कामगारांचे बैठक आयोजित करण्यात आले . या बैठकीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दशरथ नंदाल हे होते . तर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणी विष्णु कारमपुरी ( महाराज ) व महाराष्ट्र कामगार सेनेचे कायदेशीर सल्लागार अॅड . मुनिनाथ कारमपुरी यांची प्रमुख उपस्थिती होती .
प्रारंभी शिवरायांच्या मुर्तीचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर अॅड . मुनिनाथ कारमपुरी , दशरथ नंदाल यांनी शिवसंपर्क अभियानाची संपूर्ण माहिती दिली . यावेळी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी बोलतांना असे म्हणाले की , गेल्या दीड वर्षापासून देशात व महाराष्ट्रात कोरोना संकट असून या संकट समयी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी राज्यातील गोरगरीब जनता व कामगारांना विविध योजनाद्वारे आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत . म्हणजेच बांधकाम कामगार , रिक्षा चालक , घरेलू कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सक्षमतेचे योजना राबवित आहेत . आणि यात घरेलु कामगारांसाठी ही वेगवेगळ्या आर्थिक मदतीचे धोरण जाहिर केले आहे . त्यावरून ठाकरे सरकार हे गरीब व कामगारांचा सरकार आहे . असे म्हणतांना आपण ही उपस्थित सर्व कामगार सेनेचे पदाधिकारी व महिला घरोघरी जाऊन या योजनांची माहिती देऊन लोकांना लाभ मिळवून द्यावे . असे आवाहन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश म्हंता यांनी केले . सुत्रसंचलन सौ . रेखा आडकी यांनी केले . शेवटी सो .पवित्रा कारमपुरी यांनी आभार माणून बैठक संपल्याचे जाहिर केले .
सदर बैठकीस रेखा बनसोडे , छाया कांबळे , कस्तुरबाई रणदिवे , सलिमा शेख , रिजवान दस्तगिरी , अनिता बटगिरी यांच्यासह असंघटीत कामगार सेनेचे महिला व पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here