टा. सिकंदर चे सरपंच तुकाराम चव्हाण यांच्या विरोधात सोलापुरात बेमुदत उपोषण सुरू (१६ मार्च २०२१ पासून प्रकरण प्रलंबित ठेवल्यामुळे उपोषण) (जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर लक्ष घालणार का याकडे लागले संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर या गावातील सरपंच तुकाराम धर्मराज चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य आशाबाई आप्पासाहेब चव्हाण यांना तीन अपत्य असल्या प्रकरणी तक्रारदारांनी सोलापुरात दोन जून पासून पुनम गेट समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

 

पंकज सौदागर चव्हाण, ज्ञानेश्वर पुंडलिक वसेकर, भाऊराव वामन सोनटक्के, ब्रह्मदेव श्रीरंग वसेकर, नाना शाहू सोनटक्के, धर्मराज विष्णू वसेकर, सिद्धेश्वर अभिमन्यू अनुसे, सुनील अंकुश वसेकर यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

 

तक्रारदार म्हणतात सर्व पुराव्यानिशी 16 मार्च 2021 रोजी अर्ज करण्यात आला होता. या प्रकारच्या तक्रारी सहा महिन्याच्या आत निकाली काढणे बंधनकारक असून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आजपर्यंत निकाल दिलेला नाही. त्यामुळे आम्ही हे बेमुदत उपोषण करीत आहोत. दरम्यान जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here