ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांच्या शुभहस्ते “18 Artist” कला प्रदर्शनाचे उद्घाटन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्था आयोजित “18 Artist” कला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 3 मे 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. हा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांच्या शुभहस्ते, तर श्रीयुत दत्ता मुळे अध्यक्ष, महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन, मा.आमदार सुभाष बापू देशमुख अध्यक्ष, सोलापूर सोशल फाउंडेशन, नामवंत डॉक्टर उमा प्रधान, उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये सोलापुरातील 18 कलाकार आपली कला सादर करणार आहेत
अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी दिली.
हे प्रदर्शन दिनांक 3 मे ते 9 मे या कालावधीमध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत रसिकांसाठी उपलब्ध आहे, तर या प्रदर्शनाचा तमाम मुंबईतील सोलापूरकरवासियांनीही आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चित्रकार विठ्ठल मोरे यांनी केले.

आपण आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या या समूह कला प्रदर्शन संदर्भात आपल्या माध्यमातून योग्य ती प्रसिद्धी देऊन आमच्या कलाकारांच्या कलाकृती पाहण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करावे, अशी विनंती आम्ही संस्थेचे सर्व संचालक व सभासद आपणाकडे करीत आहोत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here