जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचा यल्गार, कर्मचाऱ्यांच्या संप, मोर्चास जाहिर पाठिंबा दिनांक १८ तारखेच्या मोर्चात आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार :- चेतन नरोटे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज रोजी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन लागू करण्याच्या मागणीसाठी जो संप आणि आंदोलन सुरु आहे त्या सोलापुर जिल्हा परिषद पूनम गेट जवळील आंदोलन ठिकाणी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, शहर प्रमुख विष्णु कारमपुरी, राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे, यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी समवेत भेट देऊन त्यांच्या मागणीस पाठिंबा जाहिर करून संप, आंदोलन, आणि दिनांक १८ तारखेला निघणाऱ्या मोर्चात हजारोच्या संख्येने सामिल होणार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रदेश चिटणीस किसन मेकाले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, देवाभाऊ गायकवाड, अंबादास गुत्तिकोंडा, NK क्षीरसागर, राजन कामत, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, महेश लोंढे, रूपेश गायकवाड, अनिल मस्के, दीनानाथ शेळके, संजय गायकवाड, शरद गुमटे, VD गायकवाड़, पृथ्वीराज नरोटे, सायमन गट्टू, सुभाष वाघमारे, वसिष्ठ सोनकांबले, विकास येळेगावकार, अनिता भालेराव, मनोहर चकोलेकर, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, दत्तात्रय वानकर, विट्ठल वानकर, संतोष केंगनाळकर, विजय पुकाळे, रेवन पुराणिक, गुरु कोळी, विट्ठल कुरहाडकर, सचिन चौगुले, राष्ट्रवादीचे जुबेर बागवान, सुनीता रोटे, प्रमोद भोसले, दादाराव रोटे, लक्ष्मण भोसले, सिया मुलानी, संगीता गायकवाड़ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here