– चिंचोली भोसे, ता- पंढरपूर येथे आज शनिवार दिनांक ०८/१०/२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता जि.प.प्रा.शाळेच्या वतीने भरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘बाजार डे’ चा शुभारंभ व गावात नव्याने नेमणूक झालेले ग्रामसेवक कुंभार भाऊसाहेब व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता काऺबळे मॅडम यांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ तसेच ‘ इंग्रजी मी वाचणारच’ या पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जि.प. सदस्य मा.श्री. रणजितसिऺह (भैय्या) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना श्री.रणजितसिंह (भैय्या)शिंदे म्हणाले की, शिक्षणामध्ये ज्ञानरचनावादाचा उपयोग झाला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे व कायमस्वरूपी आकलन होते. विद्यार्थ्यांना आर्थिक देवाणघेवाण कशाप्रकारे चालते याचे ज्ञान मिळण्यासाठी शाळेने जो हा बाजार डे चा उपक्रम राबविला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि विधायक आहे.
ते पुढे म्हणाले की, आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी ग्रामपंचायतीची नवीन इमारत मंजूर आहे त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे. या भागातील रस्ते व इतर विकासकामेही दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. आपल्या गावामध्ये दूध संघाचे संकलन केंद्र म्हणून नवीन डेअरी सुरु करुन सोलापूर जिल्हा दूध संघाचे संकलन वाढविण्यासाठी मदत करावी अशी विनंती त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना केली. ‘सोलापूर जिल्हा दूध संघ’ ही शेतकरी व दूध उत्पादकांची सोलापूर जिल्ह्यातील हक्काची अशी एकमेव सहकारी संस्था आहे. ही संस्था टिकली तरच शेतकरी टिकेल असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच विजय सुतार, उपसरपंच गणपत पवार, मा.सरपंच गणपत बाळासाहेब पवार, तऺटा मुक्त समितीचे अध्यक्ष नवनाथ पवार, ग्रा.पं.सदस्य विजय पवार, विजय फुलारे,गोरख भुई, लालासाहेब सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत कांबळे, मुख्याध्यापिका सविता कांबळे मॅडम, वैशाली फाकडे मॅडम, नूतन ग्रामसेवक कुंभार भाऊसाहेब, ग्रामसेवक जाडकर भाऊसाहेब इ.मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.