जिविका मराठे यांना स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार जाहीर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

द रॉयल ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्री कर्तुत्व आदिशक्ती पुरस्कार 2022 हा जळगाव च्या सुप्रसिद्ध मॉडेल आणि सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची विजेती जिविका मराठे यांना जाहीर झाला असल्याची माहिती रॉयल ग्रुप चे मैनेजिंग डायरेक्टर नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले. हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा पुढच्या महिन्यात अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. द रॉयल ग्रुप च्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणार्या महिला आणि मुलींना सन्मानित करण्यात येणार असल्याचे रॉयल च्या ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे-गायकवाड यांनी सांगितले. हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातील यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी आयोजित केला आहे .या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे . दिवा क्वीन ऑफ़ इंडिया आणि मिस्टर इंडिया आणि इंडिया किड्स हा मॉडेलिंग शो आहे आणि या शो मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळयासाठी विविध क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे .या पुरस्कार सोहळयासाठी मराठी सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहे. ज्यांना या पुरस्कार सोहळा आणि मॉडेलिंग शो साठी नाव नोंदवायचे असेल त्यांनी 9766873917 आणि 9370931509 या नंबरवर संपर्क साधावा.जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे अशी विनंती रॉयल च्या सह आयोजिका नमिताताई पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here