जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करण्यासाठी क्रीडा विकासाचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

येथील खेळाडूंची आवड बघून त्या क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्याबाबत कार्यवाही व्हावी

क्रीडा संकुल समितीने नाविन्यपूर्ण योजनेतून विविध क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी प्रयत्न करावा

 

सोलापूर, दि.23(जिमाका):- जिल्ह्यातील खेळाडूंची कोणत्या क्रीडा प्रकारात अधिक आवड आहे त्याचा प्राधान्यक्रम ठरवावा व त्या अनुषंगाने त्या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी तसेच जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना होण्यासाठी क्रीडा संकुल समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पोलीस उपअधीक्षक(गृह) एस.बी. पाटील, ॲथलेटिक कोच गणेश पवार यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, क्रीडा संकुल समितीने जिल्ह्यात जे विविध क्रीडा प्रकार खेळले जातात त्यातील प्राधान्यक्रम ठरवून मोठ्या प्रमाणावर खेळले जाणाऱ्या क्रीडा प्रकारासाठी संकुलामध्ये सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर करावा त्यासाठी नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

त्याप्रमाणेच संकुलाच्या दुरुस्तीचे जे काही प्रस्ताव असतील ते सर्व प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने संकुल समितीच्या आलेल्या प्रस्तावावर आठ दिवसात निधी मागणीचे प्रस्ताव नियोजन समितीला सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले. जिल्हा क्रीडा संकुल समिती मध्ये जास्तीत जास्त क्रीडा प्रकाराचे अद्ययावत सोयी सुविधा निर्माण करून येथील खेळाडूंना त्या सुविधाचा लाभ मिळाला पाहिजे व हे खेळाडू राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले पाहिजेत. यासाठी क्रीडा संकुल समितीने व येथील सर्व क्रीडा संघटनांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

क्रीडा संकुल समितीचे इनडोअर गाळेधारक जे कोर्टात गेले आहेत त्यांच्या विरोधात समिती च्या वतीने क्रीडा संकुल समितीची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी एक चांगला खाजगी वकिलाची नेमणूक करावी तसेच क्रीडा संकुल समितीकडे सर्व 36 गाळेधारक यांच्याकडून जुनी थकबाकी 100% वसूल करावी व त्याबाबतची सविस्तर माहिती सादर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी क्रीडा विभागास दिल्या.

 

 

 

आयत्या वेळच्या विषयांमध्ये क्रीडा संकुल समिती मधील लांब उडी चे मैदान दुरुस्तीचे काम, क्रीडासंकुल कुमठा नाका येथील मुला मुलींचे वस्तीग्रह व जुने कार्यालयात पेस्ट कंट्रोल करण्यास परवानगी तसेच मैदानावरील गवत कापण्यासाठी गवत मशीन खरेदीस समितीने मान्यता दिली. त्याप्रमाणे क्रीडा संकुल येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटलेला असल्याने त्याचे इस्टिमेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यास ही मान्यता दिली. त्या प्रमाणेच मेन गेट ते इनडोअर स्टेडियम या रस्त्यावरील उभारलेला लोखंडी पोलमध्ये बरेच अंतर असल्याने त्या ठिकाणी नवीन पोल उभारणीस ही मान्यता देण्यात आली. प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी प्रस्ताविक केले व समितीसमोर विविध विषय व आयत्या वेळच्या विषयाची मांडणी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here