जिल्ह्यातील असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर दि.16:केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाकडून असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू असून जिल्ह्यातील असंघटीत कामगारांनी नागरी सुविधा केंद्रात जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त , सोलापूर यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार, विटभट्टी कामगार, लोहरकाम, सोनारकाम,डाटा इन्ट्री ऑपरेटर, रिक्षाचालक, घरेलू कामगार, मस्य व्यवसायीक, चप्पल उत्पादन, कापड उत्पादन, यंत्रमाग, दगड खाणीतील कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, केश कर्तनालयात काम करणारे, ब्युटी पार्लर मधील कामगार, अशा इतर असंघटीत उदयोगात काम  करणाऱ्या  असंघटीत कामगारांनी नागरी सुविधा केंद्र ई-श्रम पोर्टल eshram.gov.in वर नोंदणी साठी पात्रते मध्ये कामगार हा असंघटीत क्षेत्रात काम करणारा वय 16 ते 59 मधील असावा. आयकर भरणारा नसावा, पी.एफ.व ई.एस.आय.सी. या योजनांचा सभासद नसावा.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, बँक पासबुक (आयएफसी कोड असलेल्या) स्वयं नोंदणी करीता सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक या नोंदणी करीता  तालुका स्तरावर व सोलापूर शहरात सी.एस.सी. मार्फत कॅम्प आयोजित केले आहेत तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांनी केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here