जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर  जिल्हा माहिती कार्यालयात मराठी पत्रकार दिन आज  साजरा करण्यात आला. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दर्पणदिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती संप्रदा बीडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी ‍जिल्ह्यातील पत्रकार बांधव, कार्यालयातील कर्मचारी शरद नलवडे, अमित खडतरे, श्रीमती आराध्या लोंढे, भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे  यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकार बांधवांचा गुलाब पुष्प देऊन प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. तसेच, संप्रदा बीडकर यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here