शिवसेना जिल्हा प्रमुखांसमोर शिवसैनिकांनी मांडल्या प्रश्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

राज्याच्या मुख्यमंत्री शिवसेनेचा असून ही शिवसैनिकांची कामे होताना दिसत नाहीत गेले अनेक वर्षे आंदोलने मोर्चे काढून शिवसेना रुजवली वाढवली शिवसेनेचे वटवृक्ष झाले परंतू केलेल्या कष्टाचे फळच मिळत नाही

 यामुळे शिवसैनिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शिवसैनिकावर अन्याय होत आहे किती दिवस आम्ही नुसत्याच घोषणा द्यायच्या झेंडे वागवायचे असे सवाल करत तालुक्यातील शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या समोर प्रश्न मांडले पक्षप्रमुख दत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्य जिल्ह्यामध्ये संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर हे मोहोळ तालुक्यातील कामती बु. घोडेश्वर, टाकळी सिकंदर गवात दौऱ्यासाठी आली होते.

 

 यावेळी बोलताना गणेश वानकर  बोलताना म्हणाले की; सैनिकांच्या बळावर पक्ष उभा आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार व समाजकारण घरो घरी पोहोच करण्यात शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळेच आपली पक्षप्रमुख आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी विराजमान आहेत शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाला वेळोवेळी थोपवून धरण्याचे काम मी स्वतः जातीने केली आहे.

इथून पुढे शिवसैनिकांवर अन्याय झाला तर मी गप्प बसणार नाही असे मत मांडले शिवाय ज्या शिवसैनिकांची कामे होत नसतील त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन ही करत रहा अशा सूचना त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केल्या

यावेळी याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, तालुकाप्रमुख अशोक भोसले, उपतालुका प्रमुख संतोष चव्हाण,मुकुंद अवताडे, सचिन पाटील, विनोद भोसले, नितीन बचुटे, विजय पवार, लिंगराज व्हनमाने, सिद्धाराम म्हमाणे, विष्णू कदम, विनोद आंबरे, कळस कळसुंडे, लखन शिंदे, शंकर सातपुते, मुन्ना भुसे, हनुमंत पाटील, युवराज शिंदे, प्रवीण काशीद, राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, भास्कर चव्हाण, विनोद यादव, बालाजी गव्हाणे, नामदेव सरवदे, ज्योतिबा चव्हाण, मंगेश चव्हाण, पांडुरंग चव्हाण, दिनेश चव्हाण, मारुती विभुते, हरी चव्हाण, मुन्ना सूर्यवंशी, जवाहर यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here