जप्त वाळू साठ्याचा फेर लिलाव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जप्त वाळू साठ्याचा फेर लिलाव
 
               

मंगळवेढा उपविभागातील कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या वाळू साठ्याचा लिलावासाठी आवश्यक अर्ज प्राप्त झाले नसल्यामुळे तसेच इच्छुक व्यक्तींनी अर्ज करण्यास मुदतवाढ बाबत विनंती केल्याने सदर वाळू साठ्याचा लिलाव  ३०  सप्टेंबर २०२१ रोजी  सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी दिली आहे.           

मंगळवेढा उपविभागातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत मंगळवेढा तालुक्यातील   मौजे सिद्धापूर ६१० ब्रास शासकीय किंमत सुमारे २२ लाख ५७ हजार ७४० , मौजे ढवळस येथील गट नंबर ९८, १०९/१/अ/,१९०/१अ, प्रत्येकी ५०० ब्रास प्रमाणे एकूण १५०० ब्रास, शासकीय किंमत ५५ लाख ५० हजार, मंगळवेढा पोलीस ठाणे आवारातील २८.०५ ब्रास शासकीय किंमत १ लाख ३ हजार ७८५ आहे.              

तर सांगोला तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम आवारातील १३० ब्रास, शासकीय किंमत ४ लाख ८१ हजार व सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील १७  ब्रास , शासकीय किंमत ६२ हजार ९००  इतकी आहे.  ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावयाचा आहे. अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू  साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी मंगळवार  दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा येथे सादर करावेत, असेही प्रांताधिकारी संमिंदर यांनी सांगितले.                       

तसेच लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे, आवाहनही श्री .समिंदर यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here