छत्रपती संभाजी महाराजाचा जागर शिवपुत्र संभाजी महानाट्याचा पंढरपूरात दुसरा दिवस (युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून महानाट्याचा दुसरा दिवस पार पडला)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

छत्रपती संभाजी महाराजाचा जागर शिवपुत्र संभाजी महानाट्याचा पंढरपूरात दुसरा दिवस

(युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून महानाट्याचा दुसरा दिवस पार पडला)

 

 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा नेतृत्व अभिजीत आबा पाटील स्नेह परिवार यांनी आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्य प्रयोगाचा दुसरा दिवस उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा मा.पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळेसर, उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यासह अनेक ठिकाणाहून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पूजन करून महानाट्यास सुरूवात केली.

या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “पंढरपूरच्याच नव्हे तर सोलपूर जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अभिजीत आबा पाटील, ज्या पद्धतीने चार साखर कारखाने यशस्वीरीत्या चालवत आहेत, त्याचप्रमाणे येथील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील भर घालण्याचे काम ते करत आहेत. पंढरपूर तालुक्यातील जवळपास ३५० कलाकारांना अभिजीत आबांमुळे वाव मिळाला आहे. अभिजीत आबांनी आज केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी समस्त सोलापूर जिल्हावासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.”

आमदार कैलास पाटील यांनी अभिजीत आबांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे की, “सहकार क्षेत्रात यशस्वी ठरल्यावर देखील अभिजीत आबांनी सांस्कृतिक वारसा जपला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा जागर आपल्या पंढरपूर नगरीत होत आहे, याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. या महानाट्याच्या माध्यमातून अतिशय सुरेख असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी माझ्यावतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो.”

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक अशिष मोदाणी, सी. पी. बागल, पोलीस निरीक्षक अरूण पवार, प्रशांत पाटील, राजेश नागदे, रोहीत बागल, किरणराज घाडगे, सुमनताई पवार, यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here