चितळे बंधूंना २० लाखांच्या खंडणीसाठी धमकी; क्राइम ब्रांचने शिक्षिकेसह पाच जणांना ठोकल्या बेड्या

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चितळे बंधूंना २० लाखांच्या खंडणीसाठी धमकी; क्राइम ब्रांचने शिक्षिकेसह पाच जणांना ठोकल्या बेड्या

 

पुण्यातील प्रसिद्ध चितळू बंधूंना ब्लॅकमेल करत २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दुधात काळा रंग असल्याचा दावा करत आरोपींनी चितळेंकडे खंडणी मागितली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका शिक्षिकेचा समावेश आहे. क्राइम ब्रांचने ही कारवाई केली असून करण परदेशी, सुनील परदेशी, अक्षय कार्तिक, पूनम परदेशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. याशिवाय इतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या पूनम एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका असून त्यांनी चितळे बंधूंना ईमेल तसंच फोन करुन दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडला असल्याची तक्रार करत पाच लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी बदनामी करण्याची तसंच पैसे दिले नाहीत तर दुकान बंद करायला लावू अशी धमकीही दिली होती. त्यांनी सुरुवातीला केलेली पाच लाखांची मागणी नंतर २० लाखांपर्यंत पोहोचली होती.

चितळेंनी तक्रार केल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आल्या आणि बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी आरोपींना देण्यासाठी चितळेंना २ लाख दिले होते ज्यामधअये चलनात नसलेल्या २ हजारांच्या रुपयांच्या नोटा होत्या. आरोपींनी पैसे घेतले तेव्हा पोलीस लांब उभं राहून सर्व पाहत होते. यानंतर त्यांना आरोपींना अटक केली आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

आरोपींचा एक साथीदार कार्तिक याला मुंबईतून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील, करण आणि अक्षय यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सुनील आणि करण यांचा लाँड्रीचा व्यवसायदेखील आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here