चालू गळीत हंगामातील १५ नोव्हेंबर २०२३ अखेरचे अॅडव्हान्स बिल रु।२७०१/-प्रमाणे बँकेत जमा:-श्री शिवानंद यशवंत पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चालू गळीत हंगामातील १५ नोव्हेंबर २०२३ अखेरचे अॅडव्हान्स बिल रु।२७०१/-प्रमाणे बँकेत जमा:-श्री शिवानंद यशवंत पाटील

मंगळवेढा दि।२८/११/२०२३ः- चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास हंगाम सुरु झालेपासून दि।१/११/२०२३ ते १५/११/२०२३ या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाचे पहिले अùडव्हान्स बिल जाहिर केलेप्रमाणे प्र।मे।टन रु।२७०१/-प्रमाणे ऊस पुरवठादार सभासद शेतक-यांच्या सोयीनुसार धनश्री पतसंस्थेच्या सर्व शाखा, जिजामाता पतसंस्था, मंगळवेढा, रतनचंद शहा सह।बँक-मंगळवेढा, धनलक्ष्मी पतसंस्था अरळी या संबंधीत बँकां/पतसंस्थामधील शेतकÅयांचे खात्यामध्ये वर्ग केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी दिली। पुढे बोलताना ते म्हणाले कि, दामाजी कारखान्यावर कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना ऊस पुरवठा करणा-या सभासद शेतक-यांचे विश्वासावर कारखाना पुर्ण क्षमतेने चालु आहे. या हंगामाकरिता कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र कमी असुन कमी पाऊसमानामुळे ऊसाची वाढही झालेली नाही। चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याने आजअखेर एकूण ८१८८५ मे।टन गाळप केले असून एकूण ६९७८० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे। आजचा साखर उतारा ९।६०% असुन आजअखेर साखरउतारा ८।८०%मिळाला आहे। कारखान्याची गाळप क्षमता प्रति दिन २५०० मे।टन असताना सध्या दररोज ३६०० मे।टन ३९०० मे।टन गाळप होत आहे। कारखाना पूर्ण क्षमतेने सुरु असून ऊस पुरवठादार सभासद शेतकरी यांचे विश्वासाला पात्र राहुन,ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार,मजुर,कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी यांच्या सहकार्याने गाळपाचे उद्दिष्ट निश्चीतच पार करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।

तसेच सर्व सभासद शेतकÅयांनी पिकवलेला ऊस मंगळवेढा तालुक्यात एकमेव सहकारी तत्वावर चालु असलेल्या आपल्या दामाजी कारखान्याचे गळीतासाठी पाठवुन प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात यांनी केले।

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र।कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here