चंद्रभागेचे दूषित पाणी पिऊन बेवारस भाविकाचा मृत्यू

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चंद्रभागे मधील दुषित पाण्यासंदर्भात महर्षी वाल्मिकी संघाने उठवला होता आवाज!

पंढरपूर प्रतिनिधी- गेल्या अनेक दिवसापासून चंद्रभागा नदी पात्रातील पाणी दुषीत आहे या संदर्भात महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने आवाज उठविण्यात आला होता. पण प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे आज चंद्रभागा नदी पत्रातील बेवारस भाविकाचा नदी मधील पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलाय.

आम्ही चंद्रभागेचं पाणी दूषित आहे. म्हणून आवाज उठवतो पण झोपलेला शासन जागं होत नाही. असं महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.

मध्यंतरी आम्ही चंद्रभागेचं पाणी चेकिंग केलं होतं ते पाणी पिण्यास अयोग्य आहे आता रिपोर्ट पण आला होता माघ वारी मध्ये तीन लाख भाविकांनी चंद्रभागेचे स्नान केलं व चंद्रभागेचं हे पाणी तीर्थ म्हणून पिले पण शासनाला भाविकाची जरासुद्धा दया-माया आली नाही.

त्यांनी चंद्रभागेच्या पात्रामध्ये पाणी सोडलं नाही आज चंद्रभागेचे पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर भाविकाचं अंग खाजवतोय भाविकाला फोड आल्यात पण प्रशासनाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही असही गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.

आज चंद्रभागेच्या पात्रांमध्ये आम्ही फिरत असताना रात्री रात्री एक बेवारस इसम झोपलेला आढळला आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही तो चंद्रभागेतलं रोज पाणी प्यायचा, चंद्रभागे स्नान करायचा, आता या भाविक जो मृत्यू पावलेला आहे चंद्रभागेचे पाणी पिऊन मृत्यू झाला आहे असं

येथील बेवारस भाविकांकडून सांगण्यात आले.

याची सखोल चौकशी व्हावी. या बेवारस भाविकाचा पोस्टमार्टम पुणे, मुंबई किंवा सोलापूर येथे कराण्यात यावा. आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून चंद्रभागेच्या पाण्याकडे दुर्लक्ष केलं त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी.

ह्यासाठी आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहे असा इशारा मी गणेश अंकुशराव देत आहे. यावेळी या भागातील व महर्षी वाल्मिकी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here