चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दि ११जुन रोजी होणार कोविड केअर सेंटरचे उद्घाटन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्या होणार कोविड सेंटरचे उद्घाटन!

(मा.खा.धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून उभारले गेले कोविड केअर सेंटर)

कोल्हापूर // प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय दानशूर असे व्यक्तिमत्व समजले जाणारे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी उद्या दिनांक 11 जून २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिका संचलित व भारतीय जनता पार्टी ताराराणी आघाडी व धनंजय महाडिक साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या १२५ बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन होणार असून त्याचबरोबर कणेरी मठ येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सीजन प्लांट साठी मदत स्वरूपात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. व नंगीवली तालीम यांच्या वतीने पंचगंगा नदी तीरावरील स्मशानभुमीत लाकूड प्रदान करण्याचा सुध्दा कार्यक्रम यावेळी होणार आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम येथे उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर हे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. आजपर्यंत आपण कोल्हापूर, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील राजकीय पटलावरचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व म्हणून धनंजय महाडिक यांच्याकडे पाहत आलो आहोत. त्याच अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना च्या दुसऱ्या लाटेने घमासान घातलेले असताना 125 खाटांचे हॉस्पिटल उभा करणे ही जिद्द बाळगून संपूर्ण महाडिक परिवाराने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे . याचबरोबर खासदार महाडिक यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांनी यामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिले असून “सेवा हाच धर्म” ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांची कायम शिकवण असते.

या 125 बेडच्या हॉस्पिटल मुळे सर्व गोरगरीब व कष्टकरी जनतेचे कोरोना पासून मुक्त होण्यासाठी अतिशय मोठी अशी मदत होणार आहे. या कोविड केअर सेंटर मुळे लवकर व अत्यंत वेळेवर व चांगल्या पद्धतीने सर्व रुग्णांना उपचार मिळतील अशा काही बोलक्या प्रतिक्रिया कोल्हापूर वासियांतून उमटत आहेत.

चौकट

कोल्हापूर जिल्ह्याने आज पर्यंत सर्व महाडिक कुटुंबियांना भरभरून मदत केली आहे या कोरोना महामारी च्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून त्यांना आता सध्या आला आधार देणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने 125 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आहे. व त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याचे आवाहन यावेळी मा.खा महाडिक यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here