घरदार उध्वस्त न करता पंढरपूरचा विकास केल्यास फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढू:दिलीप(बापू)धोत्रे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर कॉरीडोरबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सोलापूर येथून पंढरपूर उध्वस्त न करता पंढरपूरचा विकास करू. असे जाहीर केले . यानंतर आज पंढरपुरातील स्थानिक नागरिक , व्यापारी आणि वारकरी सांप्रदायाच्या बैठकीत फडणवीस साहेब यांच्या आभाराचा ठराव झाला. मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले दिलेले वचन पाळावे. त्यांनी कुठल्याही नागरिकाचे विस्थापन न करता घरदार न पडता पंढरपूरच्या विकास करायला जर सुरुवात केली, तर त्यांची पंढरपुरातून आम्ही हत्तीवरून मिरवणूक काढू अशी घोषणा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली.

पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि संतभूमी बचाव समिती तसेच सर्वपक्षीय बैठक आज पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीत याबाबतचा ठराव झाला. तसेच पंढरपूर कॉरिडोर बाबत देखील विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच कॉरिडॉर मध्ये लोकांची घरदार वाचवण्यासाठी आगामी काळात कुठली भूमिका असावी. याबाबतही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

यावेळी ह भ प रामकृष्ण महाराज वीर, आदित्य फत्तेपुरकर ,ऋषिकेश उत्पात , बाबाराव महाजन बडवे, श्रीकांत हरिदास, नाना मालक कवठेकर, संतोष कवडे ,सुमित शिंदे, गणेश अंकुशराव , गजानन भिंगे , नकुल बडवे यासह मोठ्या संख्येने नागरिक व्यापारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here