घरकुल लाभार्थ्यांन करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची पंचायत समिती वर धडक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

घरकुल लाभार्थ्यांन करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांची पंचायत समिती वर धडक

 

सद्यस्थितीत पावसाची परिस्थिती लक्षात घेता घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम धनादेश (चेक) अभावी अर्धवट आहे त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. काही लाभार्थी हे झोपडीत राहत आहे आपल्या घराचे काम पूर्ण होणार आपण पक्क्या घरात राहायला जाऊ या आशेवर राहून आज पावसाळा लागला असता देखील घराचे काम पूर्ण झालेले नाही , वेळेवर मस्टर वाईज चेक काढण्याची अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली यामुळे लागणारा विलंब हा त्यांच्या करिता जाचक ठरत आहे अधिकारी व कर्मचारी यांच्या कडुन वेगवेगळी कारण त्यांना सांगण्यात येत आहे घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम विना अट , विना विलंब लाभार्थ्यांच्या खात्यात सात दिवसात धनादेश रक्कम खात्यात वजा न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र स्वरूपात आंदोलन करेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नितिन गावंडे यांनी दिला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हासरचिटनिस शुभम होले , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शराध्यक्ष कपिल पोटे , युवकचे शहर सरचिटणीस हर्षल खाडे , युवकचे नितिन बाहेकर , रितेश देवके , रामतीर्थ येथील नितिन गावंडे , सामदा येथील लाभार्थी सुधाकर तराळ, रामतीर्थ येथील अनिल गावंडे , शुभम शेळके आदी पदाधिकारी व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here