ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार – आ. आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार – आ. आवताडे 

सोलापूर // प्रतिनिधी

दळणवळण सुविधा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचा दैनंदिन जीवनमान दर्जा उंचावण्यासाठी तालुक्यातील रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबवून त्यासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
 
ग्रामीण भागातील जनता ही नेहमीच रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे प्रगतीच्या आणि इतरांच्या संपर्कामुळे दूर राहते परंतु आता सदर रस्त्यांना दुरुस्त करून ग्रामीण भागातील जनतेच्या दळणवळण संपर्काला चालना देणार असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी म्हटले आहे.
 
संबंधित जिल्हा परिषद आधिकारी, पंचायत समिती आधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आ. आवताडे यांनी घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मतदारसंघांसाठी उपलब्ध निधी यांचा लेखाजोखा आ. समाधान आवताडे यांच्यासमोर मांडला.

   
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी रस्ते आवश्यक असलेल्या विविध गावांची यावेळी माहिती सादर केली. यावेळी सलगर(बु)- भुयाररस्ता , शिरनांदगी – भुयाररस्ता , सोड्डी – शिवणगी फाटा, सोड्डी फाटा – येळगी, ब्रह्मपुरी – जुना पंढरपूर रस्ता, भालेवाडी फाटा – फटेवाडी रस्ता, घरनिकी – अकोला, लक्ष्मी दहिवडी – देवळे, लक्ष्मी दहिवडी – म्हसोबा देवस्थान , मंगळवेढा – घाटूळे वस्ती, मंगळवेढा – ढवळस, लवंगी – जाडर बबलाद, तळसंगी – हिवरगाव, आंधळगाव – शेलेवाडी, व बठाण कारखाना सदर रस्ते कामास पूर्व मंजुरी देण्यात आली.
     
या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, माजी सभापती प्रदीप खांडेकर, व्हा. चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक सचिन शिवशरण, पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी उपसभापती विमल पाटील, जि. प. सदस्य मंजुळा कोळेकर, माजी उपसरपंच सतिश मोहिते, माजी सरपंच गणेश गावकरे, जि. प. शाखा अभियंता संजय देशपांडे, उपअभियंता गिरीश वाघमारे, बांधकाम अभियंता एन. डी. कोळी, कनिष्ठ अभियंता बी. एस. खंडागळे, अविनाश मोरे आदी मान्यवर व आधिकारी वर्ग उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here